TATVAMASI by DHRUV BHATT
TATVAMASI by DHRUV BHATT
परदेशात शिक्षित कथानायक अठरा वर्षांनी भारतात परततो ते अंधश्रद्धा आणि धर्मांधता यांनी ग्रासलेल्या प्रजेला योग्य दिशा दाखवण्याच्या उद्देशाने. प्रजेतील सुप्त शक्ती शोधून त्याचा समाजाला लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नात कथानायकाला आदिवासी प्रदेशात काम करीत असताना अनेक लोक भेटतात. या लोकांच्या संस्कृती, परंपरा इत्यादींचा परिचय करून घेत असताना त्याच्या मनात अनेक प्रश्नांची द्वंद्वे उभी राहतात. आधुनिक ज्ञानाच्या कसोटीवर घासून पाहताना या संकल्पना त्याला कशा दिसतात? धु्रव भट्ट हे गुजराती साहित्य जगतातील प्रसिद्ध नाव आहे. समुद्रान्तिके आणि तत्त्वमसि या त्यांच्या पहिल्या दोन कादंबर्यांना गुजरात साहित्य अकादमी तसेच तत्त्वमसिला केंद्रिय साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले आहेत. "