महामहोपाध्याय अन्नम्भट्ट विरचित तर्कसंग्रह याच्या अभ्यासाशिवाय दर्शनशास्त्राची जाणीव समृद्ध होतच नाही. महाविद्यालयातील किंवा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी आणि प्राधान्याने प्रश्नपत्रिकेतील उत्तरे सोडवण्यासाठी ज्या पद्धतीचे निरूपण अपेक्षित असते, त्याच दृष्टीने या पुस्तकात विवेचन करण्यात आले आहे. आपल्याला ज्ञान होते म्हणजे काय? व्यवहारातील ज्ञानाचा अर्थ काय? ही ज्ञान होण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? या ज्ञानाचे ज्याला शास्त्रात प्रमाण म्हणतात, ते वेगवेगळे मार्ग कोणते आहेत? या जगातील प्रत्येक पदार्थाचे नेमके स्वरूप काय आहे? त्याचे गुण कोणते आणि तेच कसे आहेत? आपले प्रत्येक वाक्य निर्दोष कसे असावे? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व विवेचन अत्यंत विज्ञाननिष्ठ कसे आहे ? अशा सर्व प्रश्नांची चिकित्सा तर्कसंग्रह आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे.
Tarksangrah
Regular price
Rs. 125.00
Regular price
Rs. 140.00
Sale price
Rs. 125.00
Unit price
per