Skip to product information
1 of 2

Payal Books

Tantya Bhilla Shetkari Aadivasi Uthav | तंट्या भिल्ल आणि शेतकरी आदिवासी उठाव संदर्भ साहित्य by

Regular price Rs. 223.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 223.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications
“जुलमी सत्तेला नकार देणे, तिच्या दृष्टीने गुन्हे ठरणाऱ्या कृती
क्रांतीचा कार्यक्रम म्हणून करीत राहणे, प्रस्थापित सत्ता मोडून तिच्या
जागी पर्यायी सत्ता उभी करणे, एकजुटीचे आधार जुळविणे,
प्रतीकात्मक स्वरूपात उठावाचे संदेश वेळोवेळी प्रसृत करणे आणि
विशिष्ट स्थलकालाच्या अवकाशात सुसंघटित प्रतिकारलढा
चालविणे, ही जी कनिष्ठ जनसमूहांच्या (सबाल्टर्न) लढ्याची सहा
वैशिष्ट्ये रणजित गुहांनी सांगितली आहेत, ती सगळीच तंट्याच्या
उठावात आपल्याला पहायला मिळतात.
तरीही आजपर्यंत कोणत्याही सबाल्टर्न इतिहासकाराला तंट्या
भिल्लाचे गूढ उकलावेसे वाटले नाही, त्याचे कारण स्पष्टच आहे –
प्रारंभी शेतकरी, आदिवासी, डावे गट अशा समाजघटकांच्या
आंदोलनांच्या अभ्यासावर रास्तपणे आधुनिकोत्तरवादाच्या आहारी
गेले आणि सबाल्टर्न शब्दाचाच निरर्थक कीस काढत बसले. सबाल्टर्न
दृष्टीच्या अभ्यासकांना जे साधले नाही ते मराठीच्या एका सिद्धहस्त
कादंबरीकाराने शक्य करून दाखवले आहे, हे नक्कीच कौतुकास्पद
आहे.
एका अलक्षित जनआंदोलनाच्या जननायकाच्या अंगाने घेतलेला
शोध कादंबरी लेखनाकडे गांभीर्यपूर्वक पाहणाऱ्या तरुण मराठी
लेखकांसाठी वस्तुपाठ ठरावा इतका महत्त्वाचा आहे.”
– भास्कर लक्ष्मण भोळे