Tantu By S L Bhyrappa Translated By Uma Kulkarni
Regular price
Rs. 710.00
Regular price
Rs. 795.00
Sale price
Rs. 710.00
Unit price
per
‘हिंसा सहसा नष्ट होत नाही, ती वाढतच राहते; आणि नवे शत्रू, नवे मार्ग शोधत राहते. हिंसा, जुलूमशाही यांची स्वत:ची अशी एक गती असते, स्वत:चेच तर्कशास्त्र असते. जुलूमशाही, लष्करशाही, एकाधिकारशाही आणि अशाच प्रवृत्तींचा कल स्वत:ची विचारशक्ती गुंडाळून ठेवण्याकडे असतो; परंतु विचार आणि सर्जकता यांवर कुणाचीही हुकमत चालू शकत नाही. त्यामुळे या प्रवृत्ती आपल्या हल्ल्याचा रोख लेखक, कलावंत, पत्रकार, विचारवंत, समाजधुरीण इत्यादींकडे वळवतात. परिणामी होणारी सांस्कृतिक हानी कधीही भरून येणारी नसते... त्या समाजाच्या संदर्भात कालचक्र जणू गोठले जाते.’ आणीबाणी घोषित होण्यापूर्वीच बराच काळ आभाळ झाकोळून आलेले होते. राज्यकत्र्यांच्या हातात सुप्त दमनतंत्राचे नवे दुधारी हत्यार आले होते. ‘न तू फिर जी सकेगा, और न तुझको मौत आएगी...’ अशी भल्याभल्यांची अवस्था करण्यात आली होती. अशा आणि त्यानंतरच्या कालखंडात एका बुद्धिप्रामाण्यवादी पत्रकाराची आणि त्याच्या कुटुंबीयांची कशी दारुण वाताहत होते, याची राष्ट्रीय पाश्र्वभूमीवर चितारलेली मन आणि मेंदू बधिर करणारी प्रदीर्घ कथा : तं तू! कन्नड साहित्यातील थोर तत्त्वविवेचक आणि निर्भीड कादंबरीकार श्री. एस. एल. भैरप्पा यांनी चित्रविचित्र धाग्यांनी विणलेले महावस्त्र : तं तू !