Skip to product information
1 of 2

Payal Books

Tan Majori By Gajvi Premanand

Regular price Rs. 105.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 105.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication
लहानपणी धरणावर काम करताना आलेला अनुभव हा या ‘तन-माजोरी’ नाटकाची प्रेरणा. आलेला अनुभव उसवून, पिंजून काढायचा नि त्याची साहित्यरूप पुनर्मांडणी करायची हे एक मोठंच आव्हान असाहित्यिक वातावरणात वाढलेल्या मला हे सारं जमेल की नाही ही भीती होतीच. पण यश हे माणसाला नेहमीच धीर देतं.
पारंपरिक मनोरंजनाच्या जोखडाखाली सुखेनैव रमणार्‍या प्रेक्षकांना हा वेगळा नाट्यविषय आपलासा वाटला नाही. ‘जनावरांच्या शेणातील धान्य वेचून, ते धुवून, वाळवून भाकरी करून खाणारे लोक गज्वींनी कुठं पाहिलेत ? शीऽ, हे काय आयुष्य आहे ? असं नाटक बघून आम्ही आमची शांत झोप का मोडावी ? नकोच ते नाटक. आम्हाला काही देणं नाही. घेणं नाही.’ ही एक प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे.
शोषक आणि शोषित हा मानव जन्मापासूनचा संघर्ष, कधीही न संपणारा ! अशाच एका संघर्षाचं रूप Poetic Justice च्या रूपात मी पाहिलं.
खरं तर या मातीचंही एक स्वप्न होतं, मानवी मूल्याच्या प्रतिष्ठापनेचं, स्वराज्यातील सुराज्याचं. पण न सुराज्य आलं न मानवी मूल्यांना प्रतिष्ठा. साधी वेठबिगारीही आपण संपवू शकलो नाही