Take Flight टेक फ्लाईट By Manoj Ambike
मनोज अंबिके हे तज्ज्ञ प्रशिक्षक, प्रसिद्ध कार्पोरेट ट्रेनर, व्यवस्थापकीय सल्लागार, लेखक तसेच प्रकाशक अशा अनेक आघाड्यांवर गेली 20 वर्षं कार्यरत आहेत. या शिवाय ते व्यवसायाच्या प्रगतीसाठी व्यावसायिकांचे वैयक्तिक कोच म्हणूनदेखील कार्य करीत आहेत. श्री. मनोज अंबिके यांनी व्यावसायिकांची कार्यक्षमता आणि व्यवसायाची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल अशी एक ‘मिरर सिस्टिम’ नावाची स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित केली आहे, ज्याचा लाभ अनेक उद्योजकांनी त्यांच्या कंपनीमध्ये करून घेतला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी खास व्यावसायिकांसाठी ‘टेक फ्लाईट’ या नावाने एक कार्यशाळा विकसित केली आहे. गेली अनेक वर्षं ते ही निवासी कार्यशाळा घेत आहेत. यातून हजारो व्यावसायिकांनी प्रशिक्षण घेऊन आपल्या व्यवसायाची वृद्धी केली आहे. हा अनुभव या पुस्तकामध्ये श्री. मनोज अंबिके यांनी अत्यंत सोप्या शब्दामध्ये मांडला आहे. असामान्य कर्तृत्वासाठी अविरत इंधन आणि ऊर्जा देणारे पुस्तक
* आर यू प्रोफेशनल * प्रॉडक्टीव्ह प्रॉडक्ट कसे ओळखाल * योग्य जागी अतीयोग्य माणूस * बॉटल नेक - गंभीर समस्या * बँड इमेज * व्यावसायिक गोल्स कसे ठरवावेत * माझे सहकारी माझी संपत्ती * पैसा कुणाचा आहे, हे महत्त्वाचं नाही * फक्त जगवू नका, जिंकवून जिंका * वेळेचे व्यवस्थापन * कार्यक्षम मॅनेजर कसे बनाल * यश टिकवायचे असेल तर...