Payal Books
Symphony सिंफनी By Achyut Godbole
Couldn't load pickup availability
अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख लिखित ‘सिंफनी’ हे पाश्चात्त्य संगीताची सफर घडवणारं पुस्तक असून यात मध्ययुग, प्रबोधन, बरोक, अभिजात, रोमँटिक आणि आधुनिक असे क ालखंड असून त्या त्या टप्प्यात बदलत गेलेल्या पाश्चात्त्य संगीताचा रंजक आणि रोमहर्षक इतिहास आहे. तसंच त्या त्या कालखंडातले दिग्गज संगीतकार, त्यांची आयुष्यं, त्यांचा संघर्ष आणि त्यांनी करून ठेवलेल्या अवीट अशा संगीतरचना यात अंतर्भूत आहेत.
ज्या वयात मुलं चालायला आणि बोबडे बोल बोलायला शिकतात, त्या वयात मोत्झार्टसारखा चिमुकला मुलगा उत्कृष्ट संगीतरचना करतो काय आणि जगप्रसिद्घ होतो काय, बहिरेपण आलेलं असतानाही बीथोवन अद्वितीय आणि अविस्मरणीय अशा संगीतरचना करून जगाला खिळवून ठेवतो काय, सगळंच अविश्वसनीय! तसंच गुलामगिरीविरुद्घ संघर्ष करणारी मीरियम मकेबा, शरीराच्या नसानसांत संगीत भरलेला मायकेल जॅक्सन, आपल्या केवळ आगमनानं प्रेक्षकांना घायाळ करणारा एल्व्हिस प्रीस्ले आणि जगभरातल्या तरुणाईला वेड लावणारे बंडखोर बीटल्स या सगळ्यांबद्दल बोलणारी चित्तथरारक, रसाळ आणि प्रेरणादायी गोष्ट आहे ‘सिंफनी’!
‘सिंफनी’ या पुस्तकाच्या शेवटी हिंदी चित्रपटसंगीतावर पडलेला पाश्चात्त्य संगीतरचनाचा प्रभाव आणि साम्य दाखवणारी जवळजवळ 150 गाण्यांची यादी दिली आहे. तसंच यात दिलेल्या क्यू. आर. कोडमुळे ‘सिंफनी’ हे पुस्तक केवळ वाचनीयच नव्हे, तर श्रवणीय देखील झालेलं आहे!
