Payal Books
SYCAMORE ROW by JOHN GRISHAM सिकॅमोर रो
Couldn't load pickup availability
SYCAMORE ROW by JOHN GRISHAM सिकॅमोर रो
सेथ हबर्ड यांनी त्यांच्या प्रचंड संपत्तीचा नव्वद टक्के भाग त्यांच्याकडे घरकाम करणार्या लेटी लँग नावाच्या गरीब, कृष्णवर्णीय मोलकरणीला मृत्युपत्राद्वारे देऊन टाकला होता! अर्थातच मृताच्या नातेवाइकांनी मृत्युपत्राच्या वैधतेला कोर्टात आव्हान दिलं. लेटीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले. अन्यही आरोप झाले तिच्यावर; पण वकील जेक ब्रिगन्स लेटीच्या पाठीशी भक्कमपणे उभा होता; कारण त्यानेच आपल्या मृत्युपत्राची केस चालवावी असं सेथ यांनी मृत्युआधी त्याला लिहिलेल्या पत्रात बजावलेलं होतं. असं काय कारण घडलं असावं, की ज्यामुळे सेथ हबर्ड यांनी त्यांच्या अगदी अखेरच्या क्षणी नवं मृत्युपत्र लिहून त्यांची बहुतेक सगळी मालमत्ता लेटीला देऊन टाकली? त्यांनी आत्महत्या करण्यासाठी फार पूर्वी ‘सिकॅमोर रो’या नावाने ओळखल्या जाणार्या एका निर्जन भागाची निवड का केली? त्यांनी ज्याचं वर्णन ‘कोणीही आयुष्यात कधीही बघू नये’ या शब्दांत केलं, असं कोणतं भयंकर दृश्य त्यांनी आणि त्यांच्या भावाने त्यांच्या लहानपणी पाहिलं होतं?
