Payal Book
Swasthyacha Chavdar Mantra - Sadhguru's Insights for Your Gastronomics by
Regular price
Rs. 240.00
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 240.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
* इनर इंजिनिअरिंग या अत्यंत लोकप्रिय अध्यात्मिक विचारसरणीचे उद्गाते सद्गुरू यांच्या कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्राच्या पाकगृहात त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणाऱ्या १०० हून अधिक आगळ्या वेगळ्या आरोग्यदायी आणि तरीही अत्यंत चवदार पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत.
* ताजी फळे व वनस्पतींपासून तयार होणारी सरबते ते स्थानिक स्तरावर उगवलेल्या भाज्यांच्या सॅलड्सपर्यंत, धान्ये, कडधान्ये यांच्या हट के पाककृती ते आमटी, रस्सा यांसह संपूर्ण भोजनापर्यंतच्या अनेकविध पाककृती साहित्य आणि कृतीसह.
* पोट आणि जीभ दोन्ही तृप्त होईल, आणि संपूर्ण पोषण मिळेल अशा पद्धतीने तयार होणाऱ्या आरोग्यदायी नाश्त्याचे, जेवणाचे आणि मिष्टान्नाचे पर्याय. आरोग्यदायी खाद्य परंपरेचे दर्शन
* अन्न सेवन हे फक्त पोट भरण्यासाठी नसून त्यातून मानसिक आणि आत्मिक समाधानही मिळाले पाहिजे. त्याकरिता अन्नसेवन करताना कोणती पथ्ये पाळावीत, याबाबत मार्गदर्शन एक योगी, आत्मज्ञानी व द्रष्टे असलेले सदगुरू ईशा फौंडेशन आणि ईशा योग केंद्राचे संस्थापक आहेत. तत्त्वज्ञान, पर्यावरण, सामाजिक प्रश्न, अशा विविध क्षेत्रातील त्यांच्या मार्गदर्शक विचार प्रकटीकरणासाठी त्यांना जगभर बोलावले जाते. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांकडून त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कार व सन्मान मिळाले आहेत. वास्तुशिल्पकला, काव्य व चित्रकला, पर्यावरण व बागकाम,क्रीडा व संगीत अशा विविध क्षेत्रात ते कार्यरत असतात. ईशा योग केंद्रातील अनोख्या इमारती व पवित्र स्थानांचे ते रचनाकार आहेत. त्याचबरोबर पाककलेतील त्यांचे नैपुण्य या पुस्तकातून आपल्याला दिसून येईल.

