Skip to product information
1 of 2

Payal Books

Swarthatun Parmarthakade Charles Handy Translated By Prashant Talnikar

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
एकीकडे जगातील एकतृतीयांश कामगार बेकार आहेत, तर त्याचवेळी दुसरीकडे जगाच्या एकूण व्यापाराच्या दोनतृतीयांश व्यापार फक्त ५०० कंपन्यांच्या हातांत आहे आणि या कंपन्या फक्त त्यांच्या गुंतवणूकदारांनाच उत्तरं देण्यास बांधील आहेत. या विषमता आणि अनिश्चिततेच्या पाश्र्वभूमीवर, बाजारपेठ अभिमुख भांडवलशाहीच्या मूल्यांपेक्षा अधिक चिरंतन आणि समृद्ध मूल्यं असणारं भविष्य निर्माण करण्याची गरज चाल्र्स हॅन्डी अतिशय कळकळीनं मांडतात. द हंग्री स्पिरीट हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे. या पुस्तकात लेखकाच्या व्यक्तिगत विचारांची तीव्रता तर जाणवतेच, पण काही वेळा ते आपल्याही विचारांना चालना देतं आणि मुख्यत: त्यात आशावाद ठासून भरलेला आहे. हे पुस्तक जिथे कुठे वाचलं जाईल, तिथे मतभेद आणि वादविवाद नक्कीच उफाळून येतील. ‘‘पुन्हा एकदा चाल्र्स हॅन्डी : द हंग्री स्पिरीट म्हणजे आयुष्यभराच्या अनुभवांचं सार आहे. भांडवलशाही समाजामध्ये कशी तग धरायची, याची ही एक व्यक्तिगत पद्धत आहे. हॅन्डी यांची शैली गोष्टीरूपानं विचार मांडण्याची असल्यामुळे पुस्तक खूपच वाचनीय झालं आहे आणि त्यांची विद्वत्ता प्रत्येक पानावर दिसून येते. हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे.’’ : पीपल मॅनेजमेंट. ‘‘द हंग्री स्पिरीट हा उद्योग-व्यापार संबंधित तसंच सामाजिक समस्यांचा एक विस्तृत शोध आहे. या समस्यांंचं हे एक चतुर, विद्वत्तापूर्ण आणि विवेकी विश्लेषण आहे.’’ : मॉडर्न मॅनेजमेंट. ‘‘चाल्र्स हॅन्डी हे ब्रिटनचे एकमेव जागतिक दर्जाचे व्यवस्थापन गुरू आहेत.’’ : डायरेक्टर मासिक. चाल्र्स हॅन्डी हे एक लेखक आणि नभोवाणी तसेच दूरचित्रवाणीवरचे नामांकित वक्ते आहेत. जगभर त्यांच्या पुस्तकांच्या दहा लाखांहून जास्त प्रती खपल्या आहेत.