Skip to product information
1 of 2

Payal Books

Swarajyache SarSenapati Hambirarao mohite by pra.Hanumantarao Pawar

Regular price Rs. 380.00
Regular price Rs. 430.00 Sale price Rs. 380.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

🚩स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते 🚩

जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज!
मराठी माणसाला पडलेलं एक स्वप्न ! हो स्वप्नच!
ज्यांचा इतिहास वाचून अंगात स्फूर्ती येते, मन भारावून जाते, डोळे डबडबतात... विश्वाच्या पसाऱ्यात एक टिंब ओळख असणारा आपला शुद्र जीव अचानक मोठा होतो. काय कारण असावं ?
शिवाजी महाराजांच्या नजरेखातर, शब्दांशिवाय प्राण द्यायला हसतमुखाने तयार असणारे मावळे, हंबीरराव मोहिते, तानाजी मालुसरे, शिवा काशिद, बाजी प्रभू देशपांडे, बहिर्जी नाईक... किती नावे घ्यावीत ? सगळी केवढी डोंगराएवढी माणसे!... मराठ्यांच्या इतिहासातील हे सुवर्णपान! यांचा इतिहास वाचला तरी महानतेचा साक्षात्कार होतो. कुठून येत होती ती उर्मी? मृत्यूला सहजपणे कवटाळणे ? ते करत असतानाही 'राजं, मुजरा' म्हणत आलेले समाधानाचे मरण !
एक ना दोन, अशी कितीतरी रत्न स्वराज्यात होती.
त्यांची चरित्रे वाचली तरी अचंबित व्हायला होते.
जशी एक तरी ओवी अनुभवावी, तसे एक तरी चरित्र वाचावे. इतिहासाच्या उजेडात वर्तमान स्पष्ट होतो.
भविष्यकाळाची वाट बनत जाते, म्हणून इतिहास वाचायला हवा. असेच महत्त्वाचे पुस्तक म्हणजे हनुमंत पवार यांनी लिहिलेले
'स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते'
हे पुस्तक म्हणजे असेच मानाचे पान ! इतिहासातील खंबीर, पराक्रमी तितकेच हळवे व्यक्तिमत्व!
नात्याच्या गुंत्यात न अडकता सत्याची बाजू घेणारे सरलष्कर ! त्यांचा देदिप्यमान इतिहास वाचताना, त्यांची आभाळाएवढी उंची मोजताना, जीव सुपाएवढा होतो.

धन्य ते छत्रपती...
धन्य ते हंबीरराव...