Payal Books
Swami Vivekananda Granthavali (9 volumes Marathi ) स्वामी विवेकानंद ग्रंथावली
Couldn't load pickup availability
Swami Vivekananda Granthavali (9 volumes Marathi ) स्वामी विवेकानंद ग्रंथावली
भगवान श्रीरामकृष्णांच्या मार्गदर्शनानुसार दुश्चर साधना करीत असता स्वामी विवेकानंदांना श्रीरामकृष्णांच्या कृपाकटाक्षाने निर्विकल्प समाधीद्वारा जगातील आणि जीवनातील अंतिम सत्याचा साक्षात्कार झाला. त्यानंतर त्यांनी यथाकाल समग्र भारतात आणि जगाच्या बऱ्याचशा भागात सुबुद्ध संचार केला. अशा रीतीने ईश्वराची आणि माणसाची प्रत्यक्ष ओळख करून घेऊन, भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनात युगोपयोगी स्वरूपात साकारलेल्या सनातन सत्याच्या अनुरोधाने स्वामी विवेकानंदांनी भारताला आणि समस्त जगाला प्रदान केलेल्या अखिल जीवनस्पर्शी संदेशाचा संपूर्ण, अधिकृत मराठी अनुवाद या ऐतिहासिक पुण्यप्रसंगी वाचकांच्या हाती देताना कृतकृत्यता वाटत आहे. स्वामी विवेकानंदांच्या तहत आजपर्यंत प्रकाशित झालेल्या, आणि त्याचबरोबर अगदी नव्याने उपलब्ध झालेल्या व अद्याप कोणत्याही भाषेत अप्रकाशित अशा सर्व व्याख्यानांचा, प्रवचनांचा, ग्रंथांचा, लेखांचा, पत्रांचा, संवाद-संभाषणांचा, मुलाखतींचा, प्रश्नोत्तरांचा, कवितांचा व इतर सर्व प्रकारच्या साहित्याचा मूळ इंग्रजीतून आणि बंगालीतून केलेला अनुवाद प्रस्तुत “ग्रंथावली”च्या एकूण दहा खंडांमधे समाविष्ट करण्यात आला आहे. स्वामी विवेकानंदांच्या आजपर्यंत उपलब्ध झालेल्या समस्त इंग्रजी व बंगाली साहित्याचा हा प्रथमच प्रसिद्ध होत असलेला अधिकृत मराठी अनुवाद होय.
