हिंदू धर्माची थोरवी जगभर समजावून सांगणारे आणि विश्वधर्म संमेलनात विश्वबंधुत्वाची भूमिका मांडणारे थोर विचारवंत म्हणजे स्वामी विवेकानंद.
स्वामी विवेकानंद यांना हिंदू धर्माइतकीच किंवा त्याहून काकणभर अधिक भारताच्या विकासाची तळमळ होती. त्यांना नवा भारत घडवायचा होता म्हणून त्यांनी भारतभ्रमण केले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरताना त्यांनी सामान्य माणसातील स्वाभिमान आणि ‘स्व’ जागृत करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे लोण देशभर पसरले; कारण त्यासाठी अनुकूल मनोभूमी विवेकानंदांच्या विचारांनी आधीच तयार करून ठेवली होती.
स्वामीजींना सामान्य माणसांविषयी तळमळ होती. सामान्य माणूस हाच त्यांच्या धर्म आणि विकास या संकल्पनेच्या केंद्रस्थानी होता. तरुणांना ते संदेश देतात, ‘माझ्या तरुण मित्रांनो, शक्तिशाली व्हा, ठाम निश्चयाचे, तेजस्वी असे शंभर युवक जग हादरवून टाकू शकतात.’
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर विवेकानंदांचे महत्त्व सांगताना म्हणतात, ‘तुम्हाला भारत माहीत करून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा. सर्व विवेकानंद सकारात्मक आहेत, त्यांच्यात नकारात्मक असे काहीही नाही.’
जगण्याला आणि जीवनाला दिशा देणारे त्यांचे विचार स्फूर्तिदायक, प्रेरणादायक आहेत. निःस्वार्थ सेवा, शब्दांचे माहात्म्य, ईश्वरावर श्रद्धा, निर्भीड आणि दयाशील वृत्ती, आत्मत्याग आणि आत्मविश्वास, कर्तव्य, प्रेम, भक्ती आणि विश्वबंधुत्व इत्यादी महत्त्वपूर्ण घटक यात येतात. जीवनाच्या अनेकविध टप्प्यांवर योग्य-अयोग्यतेची जाण देऊन प्रेरणा, चैतन्य, उत्साह व यशाकडे नेण्यासाठी या पुस्तकाची मोलाची मदत होईल. हे जाणून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक वाचायलाच हवे!
Payal Books
Swami Vivekananda | स्वामी विवेकानंद by AUTHOR :- Rajiv Ranjan
Regular price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
Sale price
Rs. 198.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
