Skip to product information
1 of 2

Payal Books

Suvarnakan By V S Khandekar

Regular price Rs. 108.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 108.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
खलिल जिब्रानच्या उत्तुंग प्रतिभेचे खांडेकरांनी घडवलेले मर्मज्ञ दर्शन. खलिल जिब्रान ह्याची प्रतिभा उत्तुंग कल्पकतेचे, मार्मिक उपरोधाचे, सूचक तत्वज्ञानाचे प्रकाशमान दर्शन घडवते. मानवी जीवनातील अटळ सत्याचे, मानवी प्रवृत्तीतील अनेक भावभावनांचे सूचक चित्र रेखाटणार्या कथा हे खलिल जिब्रानच्या कथांचे वैशिष्ट या कथा वाचल्यावर एक गूढ पण रम्य शांतीचा अनुभव येतो. निसर्गसौदर्याचा आस्वाद घेताना जो भव्यतेचा, प्रशांत आनंद मनाला प्राप्त होतो तसाच अनुभव या कथांमधून येतो. परंतू जिब्रानच्या कथांचा रसास्वाद घेण्यासाठीही उच्चकोटीची संवेदनक्षमता हवी. सहज सुलभ भाषेतून रसास्वाद घेण्याची सवय झालेल्या रसिकांना खलिल जिब्रानच्या साहित्याचे त्याच्या उत्तुंग प्रतिभेचे दिव्यदर्शन खांडेकरांनी सुवर्णकण मधून घडवले आहे. याच अर्थानं सुवर्णकण हे नावही अत्यंत समर्पक आहे. तसे पाहता खांडेकरांमुळेच मराठी रसिकांना जिब्रानची ओळख झाली असे म्हणता येईल सुवर्णकण म्हणजे जिब्रानच्या स्फुटकथा आणि त्यातील भावार्थाच्या छटा खांडेकरांनी अलगदपणे उलगडल्या आहेत. दोन मने या कथेतून अगदी जीवाभावाच्या नात्यामध्ये सुद्धा अंतकरणापासूनचे नाते असत नाही. वात्सल्यही निर्भेळ असत नाही. आई आणि मूल या नात्यातही अंतरंगातील नाते हे तिरस्काराचे असूयेचे व बाह्यनाते प्रेमाचे असू शकते हे विदारक सत्य दिसते. तर ज्योति:शास्त्रज्ञ या कथेतून बाह्यक्रांतीपेक्षा प्रगतीसाठी माणसाने अंतरंगाकडे वळले पाहिजे हे तत्त्व उघड होते. दोन पंडित मधून पढिक पंडितांच्या पांडित्याचे फोलपण स्पष्ट होते तर महत्त्वाकांक्षा या कथेतून आजच्या समाजरचनेनी एकाच्या दु:खावर दुसर्याचे सुख कसे उभारले जाते याचे दर्शन घडते. जिब्रानच्या कथा व काव्यातून त्याला मानवाच्या बंधनरहित मुक्त आत्म्याचे असलेले आकर्षण जाणवते. सामाजिक, नौतिक गुलामगिरीच्या शृंखलांनी मानवी आत्म्याला बद्ध, व विद्ध केले आहे अशा ढोंगी जीवनाचा आणि अध:पाताचा जिब्रान तीव्र निषेध करतो. व हा निषेध त्याच्या प्रत्येक कलाकृतीतून वेगवेगळ्या कलात्मक विभ्रमातून समर्थपणे गूढपणे प्रतीत होतो.