Surrounded by Idiots Murkhanchya Garadyat by Thomas Erikson सराउंडेड बाय इडियट्स (मूर्खांच्या गराड्यात)
Surrounded by Idiots Murkhanchya Garadyat by Thomas Erikson सराउंडेड बाय इडियट्स (मूर्खांच्या गराड्यात)
तुमच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावला गेला म्हणून तुम्ही कधी वादाच्या भोवर्यात सापडला आहात का?
तुमचा मुद्दा समजून घेण्याच्या तुमच्या सहकार्याच्या अक्षमतेमुळे तुम्ही कधी चक्रावून गेला आहात का?
किंवा, तुमचं म्हणणं कोणी ऐकत नाही याचा तुम्हाला कंटाळा आलाय का?
असं होणारे तुम्ही एकटेच नाही आहात. एक बडा उद्योगपती, ज्याला सतत असं वाटायचं की आपण मूर्खांच्या गराड्यात सापडलो आहोत, त्याच्याशी थॉमस एरिक्सन यांची भेट झाली. ती भेट अत्यंत भयानक होती. त्या भेटीनंतर थॉमस एरिक्सन यांनी, लोक कामं कशी करतात, एकमेकांशी सुसंवाद साधण्याकरता आपल्याला सतत संघर्ष का करावा लागतो हे समजून घेण्यासाठी स्वत:ला झोकून दिलं.