Sugarnicha Vidnyan By Dr. Bal Phondke
Regular price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 162.00
Unit price
per
माणूस आपलं अन्न शिजवायला लागला तेव्हापासून त्याच्या उत्क्रांतीतील वाटचालीनं एक महत्त्वाचं वळण घेतलं. किंबहुना माणूस आपलं अन्न शिजवायला लागला तेव्हाच ‘हन्टर गवरर’ हे स्वरूप सोडून त्यानं आपल्या सुसंस्कृत आधुनिक मानव बनण्याच्या वाटचालीला सुरुवात केली. अन्न शिजवून खायला लागल्यामुळे पचनसंस्थेत जसे उत्क्रांतिनुरूप बदल होत गेले तसा माणसाचा सांस्कृतिक विकास होत गेला. आयुर्वेदात शिजवणं या प्रक्रियेला अन्नावर संस्कार करणं असंच म्हटलं आहे. म्हणजेच शिजवण्याची प्रक्रिया हीही एक वेगळ्या अर्थानं संस्कृतीजन्य प्रक्रिया ठरते. खाण्याजोगं अन्न तयार करणं यासाठी उष्णता देण्याआधीही काही प्रक्रिया कराव्या लागतात. पूर्वतयारी करावी लागते. प्रमाण नेमकं किती असावं याचं व्यवधान राखावं लागतं. ही सगळी अवधानं पार पाडताना आपण एक वैज्ञानिक प्रक्रियाच पार पाडत असतो याची जाणीव सुगरणींना असतेच असं नाही. त्या प्रक्रियेपाठी विज्ञानाची जी संकल्पना अनुस्यूत आहे असं मी मानलं ते कितपत बरोबर आहे? आणि सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांची विज्ञानाशी फारशी जवळीक नाही अशा सुगरणींना हे विज्ञान कितपत रुचेल? की तो घास गळ्याखाली उतरणारच नाही? अशा प्रश्नांची उकल करणारे हे पुस्तक.