Skip to product information
1 of 2

Payal Books

Sudoul Raha By Pooja Makhija Translated By Suniti Kane

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
आहाराच्या सवयींबाबत तारतम्य बाळगणं म्हणजे तारेवरची कसरत. त्यात सामान्य माणसाला आहार घटकांची पुरेशी माहिती नसते. हे सामान्य ज्ञान सोप्या , सहज भाषेतून या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचतं. प्रथिने, कर्बोदकं आणि इतर आहार घटक, ते उपलब्ध असणारे पदार्थ आणि त्यांचा दैनंदिन आहारातील समावेश , या सर्व गोष्टींची शास्त्रोक्त माहिती या पुस्तकातून समोर येते. पुजा मखिजा यांची सांगण्याची रीत या पुस्तकाची जमेची बाजू. माणसाच्या आहाराच्या सवयींविषयी बोलताना त्या अनेक गमंतीशीर संदर्भ देतात. या आहाराच्या सवयींना त्या माकडाची उपमा देतात. त्या म्हणतात, माकडासारखा आहार- म्हणजे एक खूळ संपलं की दुसरं खूळ डोक्यात घेणारा आहार. अकाई बेरीजपासून अ‍ॅगयपल सायडर व्हिनिगरकडे धाव घेणारा आहार. कोणतीही नवी, चकचकीत, आकर्षक गोष्ट पाहिली की, माकड त्यावर झडप घालतं, त्यातला काही भाग टाकून देतं आणि फक्त आवडीचा तेवढाच खातं, तसा हा आहार असतो. `मंकी डाएट` तुम्हाला `नव्या` अन्नपदार्थाबद्दल अर्धी कच्ची माहिती देतं आणि त्याचे फायदे अवास्तव वाढवून सांगतं. अशा डाएटमध्ये एकाच अन्नघटकाचा अतिरेक असतो.