एक सर्जनशील व्यक्ती म्हणून या लेखिकांची घडण कशी झाली, यांच्या कथेचे विषय त्यांनी कसे आणि का निवडले, मानवी समाज, सामाजिक संस्था, साहित्य, धर्म, राजकारण, नातेसंबंध आणि संस्कृतीविषयी या लेखकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, समकालीन कथेकडे आणि वाडमयीन परंपरेकडे त्या कशा पाहतात. माध्यमांशी त्याचे नाते कसे आहे आणि त्यांनी एकूण जीवनदृष्टी कशी आहे. कशी घडली आहे. याअनुषंगाने घेतलेल्या या मुलाखती आहेत.
या मुलाखतींमधून समकालीन कथालेखकांच्या सर्जनप्रक्रीयेची ओळख तर व्हावीच पण मराठी कथाविश्वाच्या संदर्भातही त्यांची भूमिका आणि त्याचे योगदान स्पष्ट व्हावे. अशा हेतूने मुलाखती आणि जोडीला त्या लेखिकेची प्रातीनिधिक कथा अशी या खंडाची योजना केली आहे.भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या 'शाश्वती' केंद्राच्या ह्या उपक्रमाचे अभ्यासक आणि वाचक निश्चित स्वागत करतील.
Share
Choosing a selection results in a full page refresh.