Skip to product information
1 of 2

Payal Books

Stree Ani Paryavaran |स्त्री आणि पर्यावरण Author: Varsha Gajendragadkar|वर्षा गजेंद्रगडकर

Regular price Rs. 160.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 160.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

स्त्रिया आणि पर्यावरण हा विशेष महत्वाचा विषय या प्रकल्पाच्या निमित्ताने सर्वांसमोर आला आहे. भारतीय पर्यावरणाच्या संदर्भात पर्यावरणाशी असलेल्या स्त्रीच्या नात्याचा एक ऐतिहासिक पट या लेखनातून मरात प्रथमच उलगडतो आहे. वेगाने होणारी विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती, त्यामुळे झपाट्याने बदलणारे जगाचे अर्थकारण आणि

राजकारण, त्याचबरोबर चंगळवादाचा मानवी संस्कृतीला पडलेला जबरदस्त विळखा, या पार्श्‍वभूमीवर या विषयाचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे. नैसर्गिक संसाधनांची राखण आणि जपणूक करण्याची गरज सद्य:स्थितीत अत्यंत महत्वाची ठरलेली आहे आणि स्त्रियांची याबाबतीतली भूमिका तर कळीचीच आहे. हे लक्षात घेऊन वर्षा गजेंद्रगडकर यांनी या मौलिक विषयाची मांडणी केलेली आहे. आजच्या निसर्ग-पर्यावरणाच्या प्रश्‍नांमध्ये ग्रामीण स्त्रीची भूमिका काय आहे, पर्यावरणाची दुरवस्था आणि स्त्रीची दुरवस्था यांचा परस्परसंबंध काय, या प्रश्‍नांचा शोध घेणारे हे लेखन आहे. स्त्रियांचे सबलीकरण आणि पर्यावरणाचे रक्षण-संवर्धन या दोन्ही क्षेत्रांत काम करणार्‍या व्यक्ती आणि संस्था यांना एक विशेष दृष्टी देण्याचा प्रयत्न या पुस्तकाने केला आहे