मंत्रांमागील शास्त्र. ज्यावेळी तुम्हाला कुणाचीही मदत मिळण्याची शक्यता नसेल त्यावेळी ईश्वराला हाक मारावी असे स्वामी विश्वासाने सांगत असत. त्यांच्या या विश्वासाच्या मुळाशी त्यांनी बळकट श्रद्धा होती. स्वानुभवावरून किंवा काही घडलेल्या प्रसंगांवरून श्रद्धेचे सकारात्मक परिणाम स्वामीजी सांगतात. आपल्यातच नको असलेले गुण आतूनच काढून टाकण्याचे आव्हान ते आपल्याला देतात. जरी आपण सर्व जण मनुष्य म्हणून जन्माला आलो असलो, आपली सर्वांची देहरचनाही अगदी सारखी, म्हणजे दोन डोळे, दोन कान, एक नाक वगैरे अशी असली, सर्वांची अर्त:रचना ही अगदी सारखी असली तरी आपली प्रत्येकाची जडण-घडण, ठेवण वेगळी असल्याने प्रत्येक व्यक्तिगत वेळे ओळखू येते. ही गोष्ट या पुस्तकाच्या वाचनाने अधिक चांगल्या तऱ्हेने समजते. आहार, निद्रा, भय आणि मैथून या चार मूलभूत क्रियांवर ताबा मिळवला तर आपले जीवन बदलू शकते. मंत्रांमध्ये अपार सामर्थ्य आहे. श्रद्धापूर्वक मंत्रोच्चार केला तर कोणत्याही गोष्टीवर मनाला ताबा मिळवता येतो. मंत्रातील प्रत्येक अक्षराला विशिष्ट लहरी आणि आधात असतो. त्यामुळे अपेक्षित परिणाम साधता येतो. एकाही शब्दाचा उच्चार न करता केलेली प्रार्थना म्हणजे ध्यान असे त्यांचे मत आहे. प्रार्थनेमध्ये विलक्षण शक्ती असते.
Stotramantrache Vidnyan (swami shreesavitanand vaadgamay)
Regular price
Rs. 200.00
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 200.00
Unit price
per