Sports Career By Dr. Shreeram Geet & Ashish Pendse
आर्थिक-व्यावसायिक भरारीबरोबरच क्रीडाविश्वामधील
रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधींमध्येदेखील प्रचंड
वाढ झाली आहे. पूर्वी केवळ खेळाडू, प्रशिक्षक
व व्यवस्थापक एवढ्यापुरत्याच मर्यादित संधी
आता, प्रत्यक्ष खेळ, त्यासाठी आवश्यक असलेल्या
सोयी-सुविधा-सेवा, पायाभूत सुविधा,
व्यावहारिक-आर्थिक पाठबळ, सेवा-सुविधा मिळवून
देत असलेले घटक, मनोरंजनापासून ते कायद्याशी संबंधित
असलेल्या अत्यावश्यक अशा सुविधा, अशा अनेकविध
घटकांपर्यंत रोजगार-स्वयंरोजगाराचे क्षितिज विस्तारले
गेले आहे. केवळ शारीरिक शिक्षण, खेळ वा
व्यवस्थापनच नव्हे, तर सर्व विद्याशाखांमध्ये क्रीडाविषयक
संधींची प्रचंड मोठी मागणी सध्या उदयास आली आहे.
आयटी-इंजिनीअरिंग, मेडिकलप्रमाणे या संधी आर्थिक
संपन्नतेच्या दिशेने घेऊन जाणार्यादेखील आहेत.
त्याचबरोबर आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्येच करिअर
करण्याचा आनंद मिळवून देणार्यादेखील ठरत आहेत.
चला तर मग,
याच ‘स्पोर्टिंग करिअर’ची ओळख करून घेऊयात.