Payal Books
Space Travel By Achyut Godbole and Asavari Niphadkar स्पेस ट्रॅव्हल
Couldn't load pickup availability
Space Travel By Achyut Godbole and Asavari Niphadkar स्पेस ट्रॅव्हल
'अंतराळ' हा अगदी आदिमकाळापासूनच माणसाच्या कुतूहलाचा विषय आहे. तिथली रहस्यं उलगडण्याआधीपासूनच माणसाच्या कल्पनेत तिथे जाण्याची, विशेषतः चंद्रावर जाण्याची स्वप्नं दिसायला लागली. ती अनेक कथा-कादंबऱ्यांमधून मांडली जात असताना त्या कल्पना सत्यात उतरण्याची आशाही निर्माण व्हायला लागली. रशिया आणि अमेरिका या देशांनी अंतराळात आणि अगदी चंद्रावर पाऊल ठेवलं आणि एका वेगळ्याच पर्वाला सुरुवात झाली. अंतराळ संशोधनात अनेक देशांनी रस दाखवला. त्यात भारतही होता. भारताने या क्षेत्रात आपली अतुलनीय क्षमता दाखवून दिली आहे.
आज आपण चंद्रावरच काय; पण त्याही पलीकडे जाण्याची तयारी करतो आहोत. अंतराळात फक्त जाऊन परत येण्याचाच नाही, तर तिथे मानवीवस्ती करून राहण्याच्या दिशेनं पावलं पडताहेत. मानवी स्वप्नं सत्यात उतरण्याच्या या प्रवासाचा भूतकाोहिमांचा आढावा घेणारं ळ आणि भविष्यातल्या मपुस्तक म्हणजे स्पेस ट्रॅव्हल.
