Payal Books
soyabeen khadyopyog ani prakriya prayog
Couldn't load pickup availability
आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सोयाबीन आणि संबधित खाद्यपदार्थांना प्रचंड मागणी आहे. भारतीय शेतकरी मात्र सोयाबीनविषयीच्या अपप्रचारामुळे सोयाबीनचे उत्पादन घेण्यास कचरतो आणि मोठ्या आर्थिक फायद्याला मुकतो. सोयाबीनविषयीच्या गैरसमजुतींना खोडून काढून सोयाबीनच्या विविध प्रक्रिया उद्योगांविषयी समग्र मार्गदर्शन करणारे पुस्तक.
सोयाबीनमधील अपोषक घटक काढण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सोप्या प्रक्रियांची माहिती; सोयाबीनच्या पोषकतेविषयीची आधुनिक आहारशास्त्राने केलेले संशोधन
सोया दूध आणि त्यापासूनचे खाद्यपदार्थ, सोयाबीन पीठ आणि त्यापासून तयार होणारे पदार्थ, सोयाबीन तेल, सोया प्रक्रियेनंतर मिळणाऱ्या मळीपासून तयार होणारा पशु-पक्षी-मत्स्य आहार या सर्वांची विस्तारपूर्वक माहिती
विविध सोया प्रक्रिया उत्पादनांसाठीचे आर्थिक गुंतवणूक नमुने, आवश्यक संयंत्रे, सोयाबीन उत्पादनांचे पॅकेजिंग - मार्केटिंग - वितरण अशी सर्वांगीण माहिती
सोयाबीन प्रक्रिया संशोधनासाठी कार्यरत संस्थांची माहिती आणि सोयाबीन प्रक्रिया उद्योगातील प्रेरक यशकथा
घरात आपल्या कुटुंबाच्या सुपोषणासाठी सोयाबीनचा उपयोग कसा करावा हे सांगणाऱ्या सोप्या पाककृती
सोयाबीन प्रक्रिया उदयोग विषयातील तज्ज्ञ असणाऱ्या डॉ. सीताराम दगडुपंत कुलकर्णी यांनी १९७५मध्ये कृषी अभियांत्रिकी या विषयात बी.टेक. केले. १९७७मध्ये खरगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेमधून एम.टेक. केले; आणि १९९३मध्ये पीएच.डी.ची पदवी मिळवली. राष्ट्रीय पातळीवरील कृषी संशोधन सेवा परीक्षेच्या माध्यमातून १९७६मध्ये ‘वैज्ञानिक’ म्हणून त्यांची निवड झाली. त्यांनी कामाची सुरुवात भारतीय कृषी संशोधन केंद्र, नवी दिल्ली येथून केली. १९८७ ते २०१६ या कालावधीत त्यांनी भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेत मुख्य वैज्ञानिक म्हणून काम केले. या दरम्यान त्यांनी विभागाध्यक्ष, प्रकल्प संचालक, आणि संस्था संचालक या भूमिका चोखपणे सांभाळल्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी प्रक्रियायुक्त कडधान्य, सोयाबीन व फळे याबाबत सातत्याने संशोधन केले. प्रक्रियायुक्त कृषी उत्पादनाचे कार्य खेड्यातून केल्यास ग्रामीण युवकांना व स्त्रियांना रोजगार मिळू शकेल व शेतकर्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत होईल; त्याचप्रमाणे दैनंदिन आहारात सोयाबीनचा उपयोग केला तर देशातील कुपोषणाची समस्या कमी होईल, असा त्यांचा दृढ विश्वास होता. कृषी प्रक्रिया क्षेत्रात त्यांनी 200पेक्षा जास्त शोधनिबंध व अंदाजे 20-23 पुस्तके - पुस्तिका लिहिली आहेत. शेतकर्यांना, नवीन उद्योजकांना, प्रक्रिया उद्योगविषयक योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले. डॉ. सी. द. कुलकर्णी यांचे 10 मे 2019 रोजी आकस्मिक निधन झाले.
