गाओ झिंगजिआन हा चिनी नाटककार, समीक्षक, कादंबरीकार आणि चित्रकार आहे.
नोबेल पुरस्कार मिळवणारा हा पहिला चिनी लेखक. सांस्कृतिक क्रांतीच्या प्रतिक्रीयेपोटी त्यानं बिजिंगमधून पलायन केलं. ईशान्य चीनच्या सिंच्युआन प्रांतातील प्राचीन जंगले, डोंगरदऱ्या आणि पूर्वसागरी किनारा ; अशी पंधरा हजार किलोमीटरची पाच - साडेपाच महिन्यांची भटकंती या प्रवासाचं महाभारत म्हणजेच "सोल माउंटन ".
"सोल माउंटन " मानवी आत्म्याचा असामान्य थेटपणाने शोध घेते. असंख्य कथानके, प्रार्थनीय डॉयिस्ट साधू नि बौद्ध भिक्षणींपासून ते थेट पौराणिक वनमानव अशी संस्मरणीय पात्रे, महाभयंकर क्वी - चून सर्प आणि अनोळखी झाडंझुडपं यांचा शोध ह्या "सोल माउंटन" मधल्या विलक्षण गोष्टी आहेत