Skip to product information
1 of 2

Payal Books

Smrutinchi Chalta Pane… by Chandrakant bhonjal

Regular price Rs. 493.00
Regular price Rs. 550.00 Sale price Rs. 493.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

भीष्म साहनी यांचा जन्म ८ ऑगस्ट१९१५ सालचा. बालपणात खूप हूडपणा करणारे भीष्म साहनी हळूहळू वयानुसार व्यवहाराच्या टक्क्या टोणप्यांनी, कडू-तिखट अनुभवांनी खूप काही शिकत गेले. खास म्हणजे ज्येष्ठ बंधू बलराज साहनी यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाने त्यांच्या मनात एक भाव कायम जागा राहिला, एक ऊर्मी कायम जागी राहिली. त्या सार्‍या प्रवासात ते सातत्याने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वत:ला सामान्य माणूस मानत स्फूर्ती देणार्‍या नायकाचा शोध घेत राहिले. त्याने ते प्रगल्भ होत गेले. त्यातूनच त्यांच्या हातून अनेक अजरामर साहित्यकृती आणि नाटके निर्माण झाली. ‘तमस’ आणि ‘हानूश’ या त्यांपैकीच निवडक साहित्यकृती. स्वकर्तृत्वावर भरारी घेत आपले व्यक्तिमत्त्व घडवणार्‍या भीष्म साहनी यांची सदर आत्मकहाणी म्हणजे त्यांच्या आयुष्यातील सुखदु:खाचा, आशानिराशांचा पट उलगडून  दाखवताना त्यांनी संयमाची कास सोडली नाही, हेदेखील दाखवून देते. जीवनात आलेले विविध प्रवाह त्याने मनात निर्माण झालेले गोंधळ आणि त्यांचे विश्लेषण त्यांनी वस्तुस्थितीनुसार या आत्मकहाणीतून वाचकांसमोर प्राजळपणे मांडले. त्यामुळेच सदर आत्मकहाणी म्हणजे एक हृदयस्पर्शी अविष्कार आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.