Smrutikalash | स्मृतीकलश Author: Shivani |शिवानी
‘विधात्याच्या असीम कृपेमुळं जीवनाच्या वैविध्यपूर्ण कोलाहलात ज्या महान व्यत्तींचा सहवास मला लाभला, त्यांच्याकडून जे काही मला शिकायला मिळालं, त्या विलक्षण व्यक्तींच्या व्यक्तिरेखा मी थोड्या जरी रेखाटू शकले, तरी हा माझा तोकडा प्रयत्न सफल झाला असं मला वाटेल.
आश्रमातील गुरुजन, स्वत: युगपुरुष गुरुदेव, माणिकदा, सुशीला, अरुंधती, गिरधारीसारखे मित्र, डॉक्टर एरेन्सन, मिस् साइक्स, हजारीप्रसाद द्विवेदी, बलराज सहानी, गोसाईजी, क्षितीमोहनबाबू, प्रो. अधिकारी, क्षितिशदा, शांतिदा, डॉ. बाबूंसारखे गुरुजन - त्यातले काही आज आपल्यात नाहीतही - या सर्वांच्या स्मृतींनी माझ्या लेखणीला गतीशीलता दिली आहे. हे लिखाण वाचकांसमोर ठेवताना एखाद्या खडतर, प्राचीन, पवित्र देवस्थानाची
तीर्थयात्रा करून आल्यावर त्या पवित्र देवभूमीतला तीर्थप्रसाद सर्वांना मी वाटते आहे. अशी माझी भावना आहे.’ - शिवानी