Payal Books
SINDHUTIL SAMRAJYE by Alice translate Shyam Narayan Pathak सिंधुतील साम्राज्य एलिस अल्बिनिया
Couldn't load pickup availability
SINDHUTIL SAMRAJYE by Alice translate Shyam Narayan Pathak
सिंधू नदी! जगातल्या सर्वात मोठ्या नद्यांमधील एक अशी नदी आहे, जी तिबेट मधील पहाडात उगम पावून पश्चिमेकडे वाहत जाताना, उत्तर हिंदुस्तानातून पाकिस्तानात शिरते आणि कराची जवळ समुद्राला मिळते। हजारो वर्षांपासून तिची पूजा केली जात आहे। वासहतवाद्यांनी शेकडो वर्षांपासून साम्राज्ये वाढवणे आणि टिकवण्यासाठी ह्याच सिंधुचा उपयोग केला आहे। आणि आज सिंधूच्याच आधाराने पाकिस्तान देश कसाबसा टिकून आहे। पाच हजार वर्षांपूर्वी सिंधूच्या काठावर पाच समृद्ध शहर नांदत होती।याच नदीतून त्या शहरांतील व्यापारी जगभर जात येत होते। याच नदीच्या काठावर आणि त्या नष्ट झालेल्या शहरांच्या उध्वस्त अवशेषांमार्फत संस्कृत बोलणारे, संस्कृतात ऋग्वेदासारखे ग्रंथ रचणारे भटके पंडित हिंडत होते। गेल्या दोन हजार वर्षांत अॅलेक्सझाडरपासून अनेक आक्रमक अफगाणी सुलतान आणि ब्रिटिश वासहतवाद्यांना सिंधू काबीज कारण्याच्या इच्छेने वेडेपिसे करून सोडले होते।या सगळ्या धुमश्चक्रीत सिंधूच्या खोऱ्यातून शेकडो वर्ष रेशमाचे च्यापरी, चिनपासून दक्षिण-मध्य आशियापर्यंत फिरत होते। सुफी संतांचे आश्रयस्थान असलेल्या सिंधूच्या खोऱ्यातच शीख धर्माचा उदय झाला। सदर पुस्तकाचे बोट धरून वाचक, सिंधूच्या पात्रातून, काराचीपासून ते तिबेटपर्यंत दोन हजार मैल प्रवास करतीलच। त्याचबरोबर त्यांना सिंधूच्या खोऱ्यात घडलेल्या पाच हजार वर्षांच्या इतिहासाचाही मागोवा घेत येईल। तसेच इतिहासात घडलेल्या घटनांचे धागेदोरे,सिंधूच्या काठावरील वर्तमानातल्या परिस्थितीत कसे पोहोचले आहे हेही पाहता येईल।
एलिस अल्बिनिया या लेखिकेच्या जन्म लंडन येथे 1976 साली झाला। त्यांनी केंब्रिज विद्यापीठात इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला आणि स्कूल ऑफ ओरीएंटल अँड आफ्रिकन स्टडीज (लंडन) मध्ये दक्षिण आशियाच्या इतिहासाचा अभ्यास केला। सदर पुस्तक लिहिन्यापूर्वी त्यांनी भारतात दिल्ली येथे पत्रकार व संपादक म्हणून काम केले। पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत व तिबेट या देशांतून वाहणाऱ्या सिंधू नदीच्या खोऱ्यात त्यांनी केलेल्या साहसी प्रवासात, सदर पुस्तक लिहिले। या त्यांच्या पहिल्या पुस्तकाला रॉयल सोसायटीचे जेरवूड पारितोषिक देऊन गौरवण्यात आले होते।
