Skip to product information
1 of 2

Patyal Books

Sindhi By Rohini Tukdeo Onkar Thorat सिंधी रोहिणी तुकेदेओ ओंकार थोरात

Regular price Rs. 390.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 390.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Sindhi By Rohini Tukdeo Onkar Thorat सिंधी  रोहिणी तुकेदेओ ओंकार थोरात

विस्थापनाच्या राखेतून उभं राहिलेलं उद्योजकतेचं विश्व!

ज्या भूमीशी आपलं सारं आयुष्य सर्वार्थाने बांधलेलं असतं, त्याच भूमीतून अचानक उखडून फेकलं जातं आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं. तेव्हा सभोवताली नुसता अंधार पसरतो. जगण्याचे सारे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. कुठे जावं, काय करावं आणि कसं जगावं, असे असंख्य प्रश्न समोर उभे ठाकतात.

तरीही जगण्याची धडपड थांबत नाही. रडतखडत, ठेचकाळत का होईना, ती सुरूच राहते आणि त्यातून एक वेगळं विश्व नव्यानं आकाराला येतं. त्याचीच ही कहाणी आहे.

ही कहाणी आहे सिंधी समूहाची—फाळणीची दाहकता सोसलेल्या, अचानक लादल्या गेलेल्या स्थलांतराची वेदना अनुभवलेल्या आणि विस्थापितांच्या वाट्याला आलेली फरफट व ससेहोलपट सहन केलेल्या समूहाची.

या कहाणीत व्यथा आहेत, वेदना आहेत, विरहाचं दुःख आहे; जगणं उद्ध्वस्त झाल्याची आणि सारं काही गमावल्याची तीव्र सल आहे. पण दुःखाला कवटाळून बसलेलं गोठलेपण नाही. या संकटातून बाहेर पडण्यासाठी केलेली सजग धडपड आहे; नवी मूल्यं अंगीकारून पुन्हा उभं राहण्याची आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची उमेद आहे.

हाच सकारात्मक दृष्टिकोन जोपासत सिंधी समूहाने उद्योजकतेचा नवा अवकाश निर्माण केला आणि नवभारताच्या व नव्या आर्थिक युगाच्या उभारणीत आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवला.

पुस्तकाची वैशिष्ट्ये

🔸 फाळणी, स्थलांतर आणि विस्थापनातून सिंधी समूहाने केलेल्या पुनर्निर्माणाचा वेध.
🔸 संघर्षातून उद्योजकतेकडे झालेल्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी.
🔸 सिंधी समाजाची बहुअस्मिता, बहुसांस्कृतिकता आणि नवभारताच्या उभारणीतील योगदान समजून घेण्याची संधी.

हे पुस्तक कोणी वाचावे?

🔹 फाळणीचा इतिहास आणि त्याचे सामाजिक-आर्थिक परिणाम समजून घेऊ इच्छिणाऱ्यांनी.
🔹 व्यापार, उद्योग, स्थलांतर आणि समुदायांच्या उभारणीविषयी कुतूहल असणाऱ्यांनी.
🔹 प्रतिकूल परिस्थितीतून पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा शोधणाऱ्या प्रत्येकाने.

लादल्या गेलेल्या विस्थापनातून घडलेल्या जिद्दीची ही प्रेरक शोधगाथा प्रत्येकाने वाचलीच पाहिजे!