Shuggie Bain By Douglas Stuart Translated By Dr. Suchita Nandapurkar-Phadke
Regular price
Rs. 567.00
Regular price
Rs. 630.00
Sale price
Rs. 567.00
Unit price
per
एका मुलाचं आपल्या आईप्रति असणारं, हृदयाला पाझर फोडणारं प्रेम मांडणारी मर्मभेदी कादंबरी.. ग्लासगो परिसरात, १९८१ ते १९९२ यादरम्यान झालेल्या ऱ्हासाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली ही कथा शगी बेन या मार्दवशाली मुलाची आहे. त्याची आई अॅग्नेस ही जणू त्याच्या जीवनाचा प्रकाश आहे. तिचं मद्यपान सातत्याने वाढत जातं, ती विनाशाकडे ओढली जाते... या साNयाची निरर्थकता, तसंच शगीच्या चिंतेची आणि भयाची चिरंतन अवस्था आपल्याला सातत्याने जाणवत राहते. वर्षामागून वर्षं लोटतात, अपमानास्पद प्रसंगांची अखंड मालिकाच जणू सुरू राहते. त्याच्या आईचा आत्मकेंद्रीपणा, अगतिकता आणि Nहास समोर उलगडत जातो. नजरेखालून जाणारा प्रत्येक प्रसंग आत्यंतिक खरा वाटू लागतो... लेखकाची कथनशैली, दृश्यात्मकता आणि कथासूत्रावरची घट्ट पकड अखेरपर्यंत वाचकाला गुंतवून ठेवते. एकीकडे दुर्दशा आणि विनाश यांनी गच्च भरलेल्या ग्लासगो इथल्या भाषा भेदाची जाणीव वाक्यावाक्यांतून होते... तर दुसरीकडे शगी बेनच्या वेदनामय प्रवासात आपण हरवून जातो.