Shrimant peshvin Kashibai by ashwini kulkarni
श्रीमंत पेशवीण काशीबाई
अश्विनी कुलकर्णी
राज्यधुरंधर पेशवे बाळाजी विश्वनाथांच्या ज्येष्ठ स्नुषा, दिगंत पराक्रमी थोरल्या बाजीरावसाहेबांच्या धर्मपत्नी, ज्यांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्याचा जरीपटका अवघ्या हिंदुस्थानात डौलाने फडकला त्या नानासाहेब उर्फ बाळाजी बाजीरावांच्या मातुश्री म्हणजे काशीबाईसाहेब. अठराव्या शतकात हिंदुस्थानच्या राजकारणाची आरी ज्या हातांनी फिरवली ते हात काशीबाईंच्या कुटुंबातलेच होते. काशीबाई राजकारणापासून सदैव अलिप्त राहिल्या, तरीही पेशवाईची अखंड चढती कमान त्यांनी जवळून पाहिली.
पराक्रमाला वाहून घेतलेले थोरले बाजीराव पेशवे आणि सत्वशील, सोशिक काशीबाई यांच्या अलौकिक संसाराची आणि उत्कट नात्याची ही भावस्पर्शी कादंबरी.
----------------------------------------------------------------