Payal Books
Shri ShivaBharat by Sadashiv Mahadev Divakar
Couldn't load pickup availability
शिवभारत हे शिवचरित्राचे एक समकालीन आणि अतिशय विश्वसनीय साधन आहे. कै. सदाशिव महादेव दिवेकर यांनी इ.स. १९२७ मध्ये त्या ग्रंथाची संहिता मराठी अनुवादासह प्रकाशित केली.
शिवभारताच्या पाच जुन्या हस्तलिखित प्रती आतापर्यंत उजेडात आलेल्या आहेत. त्यांपैकी चार तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयात आहेत. श्री. दिवेकर यांनी प्रकाशित केलेली शिवभारताची संहिता त्यांपैकीच एका प्रतीवरून घेतली आहे. परमानंदाने शिवभारत कधी रचले याचा ग्रंथात उल्लेख केलेला नाही. आपण हे काव्य शिवाजीच्या सांगण्यावरून रचले असल्याचे परमानंद सांगत असल्याने आणि त्याची विश्वासार्हता वारंवार प्रत्ययास आली असल्याने ते शिवाजीचे अधिकृत चरित्र आहे असे समजण्यास हरकत नाही.
परमानंदाचे शिवकालीनत्व अनेक पुराव्यांनी सिद्ध आहे. त्यांपैकी एप्रिल १६६४ मधील संस्कृत पत्रातील त्याच्या उल्लेखाविषयी श्री. दिवेकर यांनी उपोद्घातात लिहिलेच आहे. त्यानंतर उजेडात आलेल्या समकालीन राजस्थानी पत्रांवरून परमानंद शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला असलेल्या परिवारात होता असे दिसून येते.
परमानंद या ग्रंथात फक्त दोनच तारखा देतो. एक शिवजन्माची व दुसरी अफझुलखानवधाची. अन्य साधनांशी ताडून बघता त्या अचूक आहेत असे लक्षात येते. परमानंदाला शिवचरित्राची जवळून माहिती होती आणि या ग्रंथात ती प्रामाणिकपणे नमूद केल्याचेही आढळून येते. त्याचप्रमाणे या ग्रंथात दिलेल्या माहितीस इतर विश्वसनीय साधनांकडूनही दुजोरा मिळतो. एकूणच, शिवभारत हा ग्रंथ शिवचरित्राच्या आणि इतिहासाच्या
अभ्यासकांना अत्यंत उपयुक्त आहे.

