PAYAL BOOKS
Shri Pandharage Viththal By M R Joshi श्री पंडरगे विठ्ठल
Couldn't load pickup availability
Shri Pandharage Viththal By M R Joshi श्री पंडरगे विठ्ठल
’’श्री पंडरगे विठ्ठल”
संत साहित्य आणि प्राचीन मराठी हस्तलिखितांचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. मधुकर रामदास जोशी यांनी गेली काही वर्षे पंढरपूर आणि विठ्ठल यावर सखोल अभ्यास करुन लिहिलेले हे नवीन पुस्तक आता अभ्यासकांना उपलब्ध आहे.
या पुस्तकात जोशींनी पौण्डरिक क्षेत्री पुंडलिक वरद विठ्ठल, डिंडिश पांडुरंग आणि शैव संप्रदाय, पांडुरंग माहात्म्य रचना, पांडुरंग विठ्ठलच्या संबंधित ताम्रपट आणि शिलालेख यांच्यावर भाष्य केले आहे तसेच त्यांचे वाचनही दिलेले आहे. पुढील भागात दक्षिण भारतातील विठ्ठल यावर ही त्यांनी दक्षिणेतील काही नामवंत इतिहास संशोधकांनी केलेल्या मांडणीवर विवेचन केलेले आहे. याशिवाय वारकरी समाज आणि संत, आणि इतरही अनेक विषयांवर सविस्तर लिखाण केलेले आहे.
पुस्तकाला ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकरांची सुरेख प्रस्तावना आहे.
पुस्तकाची पृष्ठसंख्या ४१६
