Payal Book
Shivrayanche Eknishth Mavle Netoji palkar By Prashant Kulkarni शिवरायांचे एकनिष्ठ मावळे नेतोजी पालकर प्रशांत कुलकर्णी
Couldn't load pickup availability
Shivrayanche Eknishth Mavle Netoji palkar By Prashant Kulkarni शिवरायांचे एकनिष्ठ मावळे नेतोजी पालकर प्रशांत कुलकर्णी
शिवरायांचे सरसेनापती नेतोजी पालकर हे एक प्रभावी व्यक्तीमत्व होते. अगदी लहानपणी सुलतानी राजवटीच्या अत्याचाराने पिडित असलेला त्यांचा परिवार कोकणातील चौक या गावी आला. सुलतानी संकटांशी दोन हात करुन आपल्या गावाचे रक्षण केले पाहिजे, या विचाराने त्यांनी तरुणांना एकत्र करुन शस्त्रविद्येचे प्रशिक्षण दिले. पुढे ते गावचे पाटील झाले. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर अगदी स्वराज्याची प्रतिज्ञा घेण्यापासून ते होते. प्रथम किल्लेदार व नंतर नेतोजीराव स्वराज्याचे सरनौबत झाले.
सरनौबत असताना अफजलखान प्रसंग असो अथवा थेट विजापूरची राजधानी, नेतोजींची झंझावत हे प्रसंगाने आदिलशाहची घाबरगुंडी उडाली होती. फाजलखानचा पराभव , उंबरखंडातील पराक्रम, सुरतेवरील आक्रमण या प्रसंगी नेतोजींचा चढता आलेख बघितला की, मन थक्क होते.

