Skip to product information
1 of 3

Payal Books

Shivrayanche Eknishta Mavle -Kanhoji Jedhe, Jivaji Mahala By Prashant Kulkarni शिवरायांचे एकनिष्ठ मावळे -कान्होजी जेधे, जिवाजी महाला

Regular price Rs. 100.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 100.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Shivrayanche Eknishta Mavle -Kanhoji Jedhe, Jivaji Mahala By Prashant Kulkarni शिवरायांचे एकनिष्ठ मावळे -कान्होजी जेधे, जिवाजी महाला

कान्होजीराव जेधे हे स्वराज्यातील जुने जाणते व्यक्तिमत्त्व होते. ते शहाजीराजे भोसले यांचे विश्वासू सरदार होते. शहाजीराजे नेहमी म्हणत, 'मावळात सर्वांत जबरदस्त वतनदार असेल तर ते कान्होजी होय'. कान्होजी हे आदिलशाहच्या दरबारी वतनदार होते. त्यामुळे अफजलखान प्रकरणी कान्होजी जेधेंना आपल्या बाजुला वळवण्यासाठी आदिलशहा व अफजलखानाने प्रयत्न केला. कान्होजींनी स्वराज्याशी एकनिष्ठता दाखवत शिवाजी महाराजांना साथ दिली त्याबरोबरच मावळ भागातील सर्व देशमुखांना एकत्र करुन स्वराज्यात आणले. भेदक नजर, भरभक्कम शरीरयष्टी असलेल्या जिवाजी महाला या दांडपट्टा बहाद्दराने अत्यंत चपळाईने शिवाजी महाराजांवर हत्यार उगारलेला सय्यद बंडाचा हात क्षणार्धात हत्यारासह कलम केला. त्यानंतर पुन्हा दांडपट्टा फिरवून त्याची जागेवरच खांडोळी केली. क्षणाचाही विलंब जिवावर बेतला असता.कान्होजीराव जेधे व जिवाजी महाला यांचे जीवन संघर्षाने भरलेले होते. तरी त्यांनी नशीब व भाग्य या गोष्टींना दोष न देता या संघर्षातून मार्ग काढला त्यामुळे ते मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाले.