{"product_id":"shivray-sanch-शिवराय-संच","title":"Shivray Sanch (शिवराय संच)","description":"\u003ch1\u003eShivray Sanch (शिवराय संच)\u003c\/h1\u003e\n\u003ch3\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eशिवराय संच\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e1) गनिमी कावा :अजिंक्य युद्धनितीचा गुढ मंत्र। लेखक - नवनाथ जगताप\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिवाजी महाराज आणि त्यांचे सेनापती गनिमी कावा युद्ध तंत्रात इतके माहीर आणि वाकबगार होते की स्वराज्याचे कट्टर शत्रू असलेल्या मोगली सैन्याला ते हातोहात मूर्ख बनवत. डॉ. बाळकृष्ण\u003cbr\u003eथोर इतिहासकार, तथा कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू असामान्य योद्ध्याचे अद्ययावत गुण शिवाजी महाराजांमध्ये ठासून भरलेले होते. याबरोबरच त्यांच्यात कमालीची चपळाई होती. त्यामुळे युद्धाचा निकाल बऱ्याचदा त्यांच्या बाजूने होई. एका टोकाशी युद्ध जिंकल्यानंतर क्षणार्धात ते दुसऱ्या आघाडीवर दिसत, तिकडे हाहाकार माजवून तिकडली महत्त्वाची ठाणी ते झटपट काबीज करत असत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e2) शिवचरित्र छत्रपती शिवाजी महाराज | लेखक -कृष्णराव अर्जुन केळूसकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र केळूसकरांनी लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे. केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग्रंथ नसून त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थकारण, नेतृत्व, चारित्र्य, मानवी संबंध अशा अनेक विषयांची तपशीलवार मांडणी आहे. हा युगपुरुष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e3) छत्रपती शिवाजी महाराज एका महान क्रांतीचे प्रवर्तक - डेनिस किनकेड\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे वेधक चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांचा एका दृढनिश्चयी तरुण योद्धयापासून ते मराठा साम्राज्याची स्थापना करणाऱ्या एका दूरदृष्टी असलेल्या शासकापर्यंतचा जीवनप्रवास उलगडून दाखवते. किनकेड यांनी शिवाजी महाराजांच्या नाविन्यपूर्ण लष्करी रणनीती, उल्लेखनीय वैयक्तिक धैर्य आणि स्वराज्य व न्यायाप्रती असलेल्या त्यांच्या सखोल निष्ठेचा यात वेध घेतला आहे. ऐतिहासिक वर्णनाचा एक उत्कृष्ट नमुना असलेली ही कलाकृती अशा एका नेत्याला आपल्यासमोर उभी करते, ज्यांचा वारसा अनेक पिढ्यांना निरंतर प्रेरणा देत आला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e4) शिवरायांचे रणतांडव | लेखक - प्रेम धांडे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअफजलखानाचा वध सगळ्यांना ठाऊक आहे; पण त्या दानवाच्या वधानंतर शिवरायांनी आदिलशाही मुलखात जे रक्तरंजित थैमान घातले, त्या थरारक थैमानाची ही कहाणी.\u003cbr\u003eखानाला नृसिंहाप्रमाणे फाडून, यवनी सत्तेचा मुलुख ताब्यात घेत राजे फक्त अठरा दिवसांत पन्हाळ्यापर्यंत पोहोचले.\u003cbr\u003eपण या अठरा दिवसांत काय काय घडले? शिवरायांच्या वादळी पराक्रमाची ही आजवरची सर्वात वेगवान आणि सविस्तर कहाणी!\u0026amp;nbsp;\u003cbr\u003eपन्हाळा जिंकून राजांनी विजापूर ताब्यात घेण्याची एक गुप्त योजना आखली होती. आजवर कधीही समोर न आलेल्या शिवरायांच्या त्या गुप्त योजनेला उलगडणारी ही गूढगाथा!\u003cbr\u003eत्या गुप्त योजनेचाच भाग असलेले एक युद्ध, जे कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या तीरावर लढले गेले. गनिमी काव्याची सवय असलेल्या मराठ्यांचे हे पहिलेच रणयुद्ध होते आणि त्यात त्यांची संख्या केवळ पाच हजार होती! पण शिवरायांच्या व्यूहरचना आणि युद्धनीतीच्या जोरावर त्या मराठा वीरांनी दहा हजार आदिलशाही सैनिकांची अक्षरशः भयाण कत्तल केली. राजेश्री शिवरायांनी देखील आपल्या हातात धगधगती तलवार घेऊन गनिमांची मुंडकी कापून काढली. या भयंकर युद्धाची ही एक अविस्मरणीय गाथा!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e5) शिवरायांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे । लेखक - नवनाथ जगताप\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका युगाचे नायक नव्हते; तर ते तेज, शौर्य आणि नीतीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. शून्यातून स्वराज्य उभारणाऱ्या या युगपुरुषाचे व्यवस्थापन कौशल्य आणि दूरदृष्टी आजही कालातित आहे.\u003cbr\u003e'शिवरायांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक महाराजांच्या तेजस्वी चरित्रातून वेचलेले ५१ अमूल्य मंत्र आहेत. या सूत्रांमध्ये प्रभावी नेतृत्व, अचूक नियोजन, आपत्ती व्यवस्थापन आणि निस्सीम राष्ट्रप्रेमाची गुरुकिल्ली दडलेली आहे.\u003cbr\u003eसंकटांवर मात करण्याची प्रेरणा देणारे आणि जीवनाला नवी दिशा दाखवणारे शिवरायांच्या विचारांचे हे अमृत विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या व्यावसायिकांपर्यंत, प्रत्येकासाठी एक तेजस्वी प्रकाशवाट आहे. इतिहासाच्या पानातून वर्तमानाला सामर्थ्य देणारा हा प्रेरणास्रोत तुम्ही नक्की वाचा!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e6) सुरतेची लूट की स्वराज्याची भरपाई ? । लेखक - गिरीश टकले \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुरत हे मुघल साम्राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र होते. त्यातही तेथील मुलकी व लष्करी प्रशासन स्वतः मुघल बादशहाच्या नियंत्रणाखाली होते. त्यामुळे सुरतेवरील हल्ल्याचा फटका केवळ आर्थिक नव्हे तर एकूण मुघल साम्राज्याच्या प्रतिष्ठेला शिवछत्रपतींनी दिलेला जबरदस्त धक्का होता. इंग्रज वखारीचा प्रेसिडेंट ऑक्झिडेंन १९ मार्च १६६४ च्या पत्रात म्हणतो\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e7) गुप्तहेर बहिर्जी नाईक | लेखक - नवनाथ जगताप, आरती जगताप\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमी बहिर्जी नाईक, स्वराज्याच्या गुढकथेतील अदृश्य नायक. रणांगणात तलवारींचा आवाज घुमत असताना, मी शोधत होतो शत्रूच्या छावणीतली अंधारात लपलेली रहस्य. माझं नाव इतिहासाच्या पानातून गळून पडलं, पण माझं कार्य मात्र अजरामर झालं. महाराजांनी माझ्यावर टाकलेला विश्वास, मी प्राणपणाने जपला. रोज मृत्यूला आव्हान देत मी माझी जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली. माझ्या या प्रामाणिक त्यागाची दखल इतिहासाला घेता आली नाही. कारण इतिहासालाही काही मर्यादा होत्या.\u0026amp;nbsp; माझ्या त्यागाचे साक्षीदार फक्त मी, माझे महाराज आणि काळ होता. इतिहासाने दखल घेतली नसली तरी महाराजांनी घेतलेली दखल माझ्यासाठी अनमोल आहे. त्याच्यापुढे लाखो करोडोंची जहागिरी माझ्यासाठी कवडीमोल आहे. ही कांदबरी त्याच त्यागाचा उलगडा करते....\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e8) शिवचरित्र एका युगपुरुषाची जीवनगाथा । लेखक - प्रशांत कुलकर्णी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'छत्रपती शिवाजी महाराज!'हे केवळ नाव नाही, ही एक अशी उर्जा आहे, जिच्या केवळ स्मरणाने आजही मराठी माणसाच्या नसानसात स्वाभिमान संचारतो.\u0026amp;nbsp;हा एक विचार आहे - स्वातंत्र्याचा, स्वधर्माचा, स्वभाषेचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा. एका अशा युगात, जेव्हा शेकडो वर्षाच्या अंधकारमय गुलामगिरीत अवघा भारत देश जखडला होता आणि परकीय सत्तेपुढे उभे राहण्याचे धाडस कोणातही नव्हते, तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत या विचाराने जन्म घेतला. राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि शहाजीराजांच्या पराक्रमाचा वारसा घेऊन एका क्रांतीला सुरुवात झाली. महाराजांनी अशक्य ते शक्य केले. त्यांनी सामान्य, विखुरलेल्या माणसांना एकत्र आणले, त्यांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत पेटवली आणि आपल्या अजोड पराक्रमाने व अचूक रणनीतीने रयतेच्या 'हिंदवी स्वराज्याची' मुहूर्तमेढ रोवली. हे पुस्तक म्हणजे केवळ एका राजाची शौर्यगाथा नाही, तर ती एका खन्ऱ्या 'युगप्रवर्तका'च्या प्रेरणादायी संघर्षाची, त्याच्या दूरदृष्टीची आणि कालातीत तत्त्वज्ञानाची ओळख आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e9) महापुरुषांच्या नजरेतून शिवराय | लेखक : वैभव साळुंके\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते. - स्वामी विवेकानंद वास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे. - रवींद्रनाथ टागोर शौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले. - यशवंतराव चव्हाण आपणास स्वातंत्र्य हवे असेल, तर आपणास शिवाजी महाराजांच्या मार्गाने जावे लागेल. - सुभाषचंद्र बोस\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50146868363457,"sku":null,"price":2500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Shivray_Sanch.webp?v=1776585959","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/shivray-sanch-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9a","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}