Payal Books
Shiva Kashid By Prem Dhande शिवा काशीद
Couldn't load pickup availability
Shiva Kashid By Prem Dhande शिवा काशीद
त्या अंधाऱ्या रात्रीला, कोठेतरी मोडून पडलेल्या त्या पालखीला, आजही जिवंत असलेल्या त्या वाटेला, पन्हाळ्याच्या बुरूज-कड्यांना आणि एके काळी सिद्दी जौहरची छावणी ज्या ठिकाणी होती त्या भूमीला, बस, यांनाच तो वीर आज स्मरणात असेल. त्याचा पराक्रम आजही त्यांच्या आठवणीत असेल.
शिवाजीराजांवर धावून आलेला काळ त्याने आपल्या अंगावर झेलला. आपले बलिदान देऊन त्याने आपल्या स्वामीला पन्हाळ्यातून निसटण्यास मार्ग मोकळा करून दिला; पण त्याच्या धाडसाची आणि शूरत्वाची ही एवढीशी गोष्ट मुळीच नव्हती.
तो जन्मलाच होता शिवाजी राजा म्हणून मरण्यासाठी !
त्याचा चेहरा शिवाजीराजांच्या चेहऱ्याशी मेळ खात होता. राजांच्या आणि त्याच्या नावात साम्य होते. जणू राजांची सावलीच तो! त्याच्या पत्नीचा आणि महाराणी सईबाईसाहेबांचा मृत्यूदेखील एकाच महिन्यात झाला होता. म्हणजेच, वाट्याला आलेले दु:ख देखील सारखेच! राजांप्रमाणेच तो पराक्रमासाठी सदैव आसुसलेला असे. जसे शिवराय आपली मऱ्हाठभूमी अत्याचारी तुर्कांपासून मुक्त करण्यासाठी धडपडत होते, तसेच तो पन्हाळा यवनी जाचातून मुक्त व्हावा, यासाठी कायम धडपडत होता.
दोघांमध्ये एवढे साम्य कसे? हा फक्त योगायोग होता, की विधात्याची अद्भुत किमया ?
या सर्व प्रश्नांचा मागोवा घेणारी आणि इतिहासात नेऊन शिवा काशीद या विराच्या शौर्याचा आणि बलिदानाचा इतिहास उलगडणारी एकमेव कादंबरी!

