SHIVPATNI MAHARANI SAIBAI by DR. SUVARNA NAIK NIMBALKAR
SHIVPATNI MAHARANI SAIBAI by DR. SUVARNA NAIK NIMBALKAR
महाराणी सईबाई` म्हणजे सकल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे यांच्या ज्येष्ठ पत्नी वा महाराणी या एकाच भूमिकेतून चरित्र नायिकेचा आढावा घेणे हाच केवळ या चरित्रग्रंथकाराचा हेतू नसून नाईक निंबाळकर राजघराण्याची सुकन्या, भोसले घराण्याची स्नुषा, राजमाता जिजाऊ माँसाहेबांची सून आणि भोसले घराण्याच्या तीन सुकन्या व एकमेव छावा छत्रपती संभाजीराजे यांच्या मातोश्री अशा विविध अंगाने अत्यंत प्रभावीपणे सईबाईच्या व्यक्तित्वाचा आढावा घेण्याचा प्रयत्न येथे झालेला दिसून येतो. महाराणी सईबाईची `सय` अवघा महाराष्ट्र सदैव उरात जपेल आणि या ग्रंथाच्या वाचनातून वाचकांच्या मनात सईबाईच्या कार्याचा ओलावा सदैव राहील अशीच अपेक्षा आहे