Skip to product information
1 of 2

Payal Books

SHIVKALIN SAMAJVYAVASTHAशिवकालीन समाजव्यवस्थासचिन गरुड

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

शिवरायांचे लोकविलक्षण नेतृत्व स्वराज्यक्रांतीस गती देणारे ठरले. तत्कालीन मराठा सरदार शूर, कर्तबगार असले तरी मुस्लिम शास्त्यांचे चाकर होते. ते पारंपरिक चाकोरी सोडण्यास तयार नव्हते. शिवरायांनी कोणत्याही सत्तेचे चाकर होण्याचे नाकारले आणि स्वातंत्र्याचा स्वाभिमानी मार्ग स्वीकारला. त्यांनी लोकसंघटन व फौज राजकीय-सामाजिक ध्येयवाद ठेवून उभारली. वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा सामूहिक हिताला महत्व दिले. शिवरायांचे व्यक्तिमत्व असामान्य होते. शौर्य, साहस, सृजनशीलता आणि सामाजिक ध्येयनिष्ठा होती. स्वकर्तृत्वाने आणि सामाजिक संघटनशक्तीच्या जोरावर त्यांनी स्वतःसह मराठी समाजाला रचनात्मक आकार दिला आणि इतिहास घडविला....

 

पारंपरिक इतिहासलेखन मध्ययुगीन भारताच्या सामाजिक इतिहासाबद्दल अनेक चुकीच्या धारणा प्रसूत करते. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाची एकांगी मांडणी केली जाते. या पार्श्वभूमीवर शिवकालीन इतिहासाचे बधार्थ आकलन करण्यासाठी हे पुस्तक एक महत्वाचे साधन ठरते.