Payal Books
Shivaji Maharaj The Greatest - शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट Authors : Hemantaraje Gaikwad
Couldn't load pickup availability
डॉ. हेमंतराजे गायकवाड यांच्या या ग्रंथात शिवपूर्व काळापासून ते महाराजांच्या महानिर्वाणापर्यंतच्या त्यांच्या चरित्राचा आलेख चिकित्सक वृत्तीनं मांडण्यात आला आहे. शिवपूर्व काळातील महाराष्ट्राची परकीय आक्रमकांकडून होणारी लचकेतोड, स्वकीयांची फुटीरवृत्ती, लाचारी, स्वार्थांधता, अंधश्रद्धा आदींमुळे महाराष्ट्रधर्माची अस्मिता पूर्णपणे अंधारली होती. पुन्हा प्रकाश निर्माण होण्यासाठी 350 वर्षांचा काळ जावा लागला आणि भोसले घराण्यातून एका "स्फुल्लिंगा'ची निर्मिती झाली. शहाजीराजे आणि जिजाऊसाहेब यांनी या "ठिणगी'ला प्रज्वलित केलं आणि "श्रीशिवाजी'नामक एक स्वातंत्र्ययज्ञ निर्माण झाला.
