PAYAL BOOKS
Shivacharitra Vrutasangrah Khand 1 te 3 By G h Khare शिव चरित्र वृत्तसंग्रह,खंड १ ते ३ अनुवादक श्री पां. भी. देसाई ग. ह. खरे
Couldn't load pickup availability
Shivacharitra Vrutasangrah Khand 1 te 3 By G h Khare शिव चरित्र वृत्तसंग्रह,खंड १ ते ३ अनुवादक श्री पां. भी. देसाई ग. ह. खरे
शिव चरित्र वृत्तसंग्रह, खंड १ ते ३,
खंड १ चे अनुवादक श्री पां. भी. देसाई आणि खंड २ व ३ चे संपादक ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. ग. ह. खरे आहेत. खंड १ मधे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित ८ बखरीवजा गद्यपद्यात्मक कानडी ग्रंथांचा अनुवाद दिलेला आहे. यावरुन आपल्याला कर्नाटकातील काही राजवटी, ग्रामनामे या विषयी माहिती मिळते. खंड २ मधे आदिलशाही इतिहासाची माहिती देणारे मुहम्मदनामा, तारीख-इ-अली, अलीनामा, हफ्तकुर्सी आणि बसातीनुस्सलातीन या पाच ग्रंथाचे भाषांतर सारांशरुपाने दिले आहे. खंड ३ मधे फुतुहात-इ-आदिलशाही, आलमगीर-नामा, मुस्तखबुल-लुबाब आणि मआसिर-इ- आलमगीरी या चार फार्सी ग्रंथातील फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित माहिती सारांश रुपाने दिलेली आहे. आता मंडळाने या तीनही खंडां एकत्र मिळून एक पुस्तक म्हणुन पुन:प्रकाशन करीत आहे.
