Shikharavarun By Edmand Hillary, Shrikant Lagu
Regular price
Rs. 350.00
Regular price
Sale price
Rs. 350.00
Unit price
per
एडमंड हिलरी म्हणजे शेर्पा तेनसिंगसह उत्तुंग एव्हरेस्ट शिखर सर करणारे साहसवीर! ‘एव्हरेस्ट’ व्यतिरिक्त यांनी— ० स्नो-कॅट ट्रॅक्टरने दक्षिण ध्रुवावर यशस्वी मार्गक्रमण ० उत्तर ध्रुवावर रोमहर्षक मोहीम ० जेट बोटीने बंगालच्या उपसागरातून गंगा नदीचा माग काढत तिच्या उगमापर्यंत जाण्याचा अचाट उपक्रम अशी मानवाला अशक्यप्राय वाटणारी अनेक साहस-शिखरे गाठली. व्यक्तिगत जीवनातही दु:खाचे डोंगर पेलणार्या मृदु-निर्मळ हिलरी यांनी मानवतेचा ओलावा जीवनभर जोपासला. भारताशी अतूट नातं जोडणार्या न्युझीलंडवासी हिलरींनी हिमालयातील लोकांसाठी जे कल्याणकारी कार्य हाती घेतले, ते आजतागायत सुरू आहे. भारतप्रेमी हिलरींनी भारतात ‘हायकमिशनर’चे पदही भूषविले. त्यांच्या साहसी उपक्रमांची माहिती देणारी, त्यांचे रोमहर्षक अनुभव कथन करणारी आणि त्यांचे सार्थ व्यक्तिगत जीवन उलगडणारी ही त्यांची आत्मगाथा ‘शिखरावरून’!