PAYAL BOOKS
Shastra Te Shaastra Paperback by Girija Dudhat शस्त्र ते शास्त्र
Couldn't load pickup availability
Shastra Te Shaastra Paperback by Girija Dudhat शस्त्र ते शास्त्र
ज्याप्रमाणे संस्कृतीची स्वतःची साधने असतात, त्याचप्रमाणे शस्त्रांचीही स्वतःची एक संस्कृती असते. भारताच्या शस्त्रसंस्कृतीमध्ये शस्त्रांना कधीही केवळ ‘युद्धाची साधने’ मानले गेले नाही. शस्त्रांची निर्मिती आणि व्यापार, धार्मिक व सांस्कृतिक चालीरीती आणि परंपरांमधील त्यांचे स्थान, लोकविधींमधील त्यांची भूमिका आणि अध्यात्माच्या क्षेत्रातील त्यांचे महत्त्व यांमधून भारताची बहुआयामी शस्त्रसंस्कृती प्रकट होते. शस्त्रांच्या सांस्कृतिक इतिहासाचा शोध म्हणजे—पारंपरिक अर्थाने—केवळ भौतिक ‘शस्त्रा’चीच चौकशी नव्हे, तर त्याभोवती विकसित होत असलेल्या मानवी धारणा आणि दृष्टिकोनांचा शोध होय. गिरिजा दुधात यांनी लिहिलेल्या ‘शस्त्र ते शास्त्र’ या पुस्तकाच्या माध्यमातून, पारंपरिक भारतीय शस्त्रास्त्रांच्या या विविध विधीविषयक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पैलूंचा उलगडा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

