SHARIR शरीर By Achyut Godbole
मानवी शरीरातल्या पेशी, अवयव आणि अवयवसंस्था यांची रचना आणि कार्य या विषयीची अत्यंत रंजक माहिती
आपणाला 'शरीर' या पुस्तकात वाचायला मिळेल. गर्भाच्या वाढीपासून मृत्यूपर्यंतच्या शरीर
विज्ञानासह पचनसंस्था, मज्जासंस्था, श्वसनसंस्था अशा सगळ्याच संस्थांची यात ओळख करून दिलेली आहे.
यात फक्त आपल्या शरीराचं विज्ञानच नाही तर मानवी शरीररचना आणि कार्य यांची प्रत्यक्ष माणसाला
कशी ओळख होत गेली याचा गेल्या काही हजार वर्षांपासून आताच्या आधुनिक काळापर्यंतचा सुरस इतिहास,
त्यातल्या वैज्ञानिक आणि मानवी शरीराबद्दलच्या अनेक गमती जमती यात सांगितल्या आहेत.
शालेय विद्यार्थ्यांपासून पदवीच्या विद्यार्थ्यांपर्यंत तसेच शिक्षक, वैद्यकीय क्षेत्रांतल्या व्यक्ती आणि
जिज्ञासू वाचक अशा सर्वांनीच वाचावं आणि संदर्भ ग्रंथ म्हणून संग्रही ठेवावं असं हे पुस्तक आहे!