SHAHU MAHARAJANCHYA ATHAVANI by DR. JAYSINGRAO PAWA
SHAHU MAHARAJANCHYA ATHAVANI by DR. JAYSINGRAO PAWA
ज्यांना शाहू महाराजांचा सहवास लाभला अशा लोकांनी महाराजांच्या सांगितलेल्या आठवणींचं हे भाई माधवराव बागल यांनी केलेलं संकलन आहे. शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू या आठवणींमधून समोर येतात. प्रयाग स्नानाला महिनाभर जात असताना महाराज शूद्र आहेत म्हणून पुराणोक्त सांगणार्या नारायण भटजींमुळे महाराजांना ब्राह्मण्याचा बसलेला पहिला तडाखा, महाराजांच्या विश्वासातील ब्राह्मण लोक, गोविंदराव टेंबे यांच्या सांगण्यावरून एका असहाय विधवेला मदत करण्यासाठी महाराजांनी शोधलेला सयुक्तिक मार्ग, गंगाराम कांबळेच्या चहाच्या दुकानासमोर जाऊन महाराजांचं चहा पिणं, महाराजांच्या मेहुण्याने त्यांच्या हुजऱ्याला स्वत:च्या पायातले बूट काढायची केलेली आज्ञा आणि महाराजांनी मेहुण्याची केलेली कानउघाडणी, बालगंधर्व, आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना महाराजांनी दिलेलं प्रोत्साहन इ. आठवणींमधून महाराजांचं पुरोगामी, दिलदार, प्रेमळ, न्यायप्रिय, द्रष्टं, गुणग्राहक, हजरजबाबी, साधेपण जपणारं व्यक्तिमत्त्व समोर येतं.