Shahid Bhagatsinh Samagra Vangmaya By Datta Desai
भगतसिंहचे आजवरचे सर्व उपलब्ध लेखन एकत्र आणणारा भारतातील एकमेव ग्रंथ
‘प्रखर देशप्रेम म्हणजे काय?’ या प्रश्नाचे उत्तर आहे : भगतसिंह!
भारतीय उपखंडातील क्रांतिकारकांचा मेरुमणी : शहीद-ए-आझम भगतसिंह!!
सर्व संकुचितपणाच्या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय ऐक्य व विश्वबंधुत्व प्रत्यक्षात साकार करू इच्छिणारा एक द्रष्टा...
धर्म आणि धर्मांधता, जात आणि अस्पृश्यता, भाषा आणि साहित्य, प्रेम आणि नैतिकता, नास्तिकता आणि मानवता या सार्यांचा अत्यंत प्रगल्भ विचार करणारा एक युवक...
स्वातंत्र्य संग्रामातील सर्व प्रवाहांवर आणि तमाम भारतीय जनतेवर प्रभाव टाकणारा आणि भारतीय क्रांतीचा कार्यक्रम मांडणारा कृतिशील विचारवंत...
आजच्या समस्यांवर दहशतवाद नव्हे, तर समाजवादी क्रांती हेच खरे उत्तर आहे, असा ठाम विश्वास असलेला क्रांतिकारक...
अशा भगतसिंहांची विविध रूपे आपल्या समोर येतात या समग्र वाङ्मयातून... आणि त्यांच्या प्रत्येक कृतीला असलेले वैचारिक अधिष्ठान, पाश्चात्त्य पार्श्वभूमीचे चिंतन आणि भारतीय समाजस्थितीचे मूलगामी विवेचन यांचा अजोड मिलाफ यांचे यातून दर्शन होते...
शहीद भगतसिंह : समग्र वाड्मय – संपादक दत्ता देसाई , मूळ दस्तऐवजांचा स्त्रोत प्रा. चमनलाल