Payal Book
Shahenshah By N S Inamdar शहेनशहा ना. सं. इनामदार
Couldn't load pickup availability
Shahenshah By N S Inamdar शहेनशहा ना. सं. इनामदार
साधारण ३०० वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या छाताडावर दैत्य होऊन नाचलेला एक क्रूर सेनानी - औरंगजेब आजवर औरंगजेब म्हणजे खलनायक, एक क्रूर, पाशवी शक्ती लाभलेला इस्लामी शहेनशहा एवढंच ऐकलं होतं. इनामादारांनी कादंबरीच्या स्वरुपात मांडल्यामुळे असेल कदाचित पण मला मात्र हा खलनायक , खलनायक न वाटता एक जबरदस्त सेनानी, कुशल राजकारणी आणि कडवा मुसलमान वाटला. अफाट सत्तेची हाव असणं हे ३०० वर्षापूर्वी तरी निश्चितच "खलनायक" बनण्यासाठी पुरेसं नव्हतं. त्याने भावांना मारलं नसतं तर मुघल परंपरेप्रमाणे त्याला त्याच्या भावांनी मारलं असतं. तो जगला, त्याने राज्य केलं कारण तो त्यासाठी सक्षम होता, लायक होता. त्याला शिकवल्या गेलेल्या, समजावल्या गेलेल्या इस्लामचं त्याने आयुष्यभर पालन केलं. मला इतिहास माहीत नाही पण ना.सं. इनामदारांनी "मांडलेला" शहेनशहा मात्र मला खटकला नाही कारण त्याच्या वागण्याचं त्याच्याकडे Justification" होतं.
