Shabd Aani Shabdkosh शब्द आणि शब्दकोश by Niranjan Ghate
Shabd Aani Shabdkosh शब्द आणि शब्दकोश by Niranjan Ghate
समोरच्याशी संवाद साधण्याच्या माणसाच्या असोशीतून शब्द आणि भाषा तयार झाल्या. लॅटिन, ग्रीक, रोमन या प्राचीन भाषा; पुढे फ्रेंच भाषेचा वरचष्मा, त्यात आधी मागे पडलेली आणि पुढे जगन्मान्य झालेली इंग्रजी, या भाषेने इतर भाषांमधून सामावून घेतलेले शब्द- अशा शतकानुशतकांच्या प्रवाहाची रोमहर्षक झलक म्हणजे हे पुस्तक. तितकाच रोमहर्षक आहे शब्दकोशांचा इतिहास. केवळ शब्दार्थ सांगणारे कोश, म्हणी-वाक्प्रचारांचे कोश इथपासून ते लघुरूपांचे, अगदी अर्वाच्य शब्दांचेही कोश तयार करण्यामागचा आटापिटा त्यातून झालेली भाषांची घुसळण, हे सारं वाचताना मानवी संकृतीचा एक मोठा पटच आपल्यासमोर उलगडतो. हे पुस्तक हसतखेळत भाषेकडे बघण्याची एक अभ्यासू नजर देतं.