Setu madhavra Pagdi 8 PUSTAKANCHA SET सेतू माधवराव पगडी ८ पुस्तकांचा सेट
सेतुमाधवराव पगडी हे मराठ्यांच्या इतिहासावरील संशोधक तसेच विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार आणि महाराष्ट्र सरकारच्या 'गॅझेटियर्स' चे संपादक व लेखक होते. पगडी हे उर्दू आणि फारसी चे उत्तम जाणकार होते. महाराष्ट्राबाहेर मराठ्यांवर उपलब्ध असलेली अनेक फारसी-उर्दु ऐतिहासिक साधने त्यांनी अभ्यासली. द्वेषभावनेपलीकडे जाऊन मराठ्यांचे कौतुक शत्रू करतो म्हणजे मराठे किती प्रचंड पराक्रमी असतील, हे पगडी सांगतात. पगडी प्रामाणिक इतिहासकार असल्यामुळे स्पष्ट व निर्भीड होते. मराठे व निजाम यांच्यातील उर्दू-फारसी पत्रव्यवहार पगडींनीच प्रथम मराठीत आणला. शिवकाल, मराठ्यांचे स्वातंत्र्ययुध्द, पानिपत, महाराष्ट्राबाहेर मराठे या महत्वाच्या विषयावरील पगडींचे इतिहास संशोधन वाखाणण्याजोगे आहे.. 'सामान्य वाचकाला समजेल अशा भाषेत मराठ्यांचा संशोधनात्मक
इतिहास' हे पगडींच्या लेखनाचे वैशिष्ठ्य आहे. त्यांच्या ६० वर्षांच्या अचाट इतिहास संशोधनाचा गौरव भारत सरकारतर्फे होऊन त्यांना १९९२ साली 'पद्मभूषण' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पगडींनी मराठ्यांच्या इतिहासावरील अनेक पुस्तकांचे लेखन केले त्यापैकी प्रमुख ८ पुस्तके प्राकृत प्रकाशन, पुणे द्वारा प्रकाशित होत आहेत