Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Set Of Two Important Historical Books दोन महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पुस्तकांचा संच

Regular price Rs. 1,190.00
Regular price Rs. 1,400.00 Sale price Rs. 1,190.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Set Of Two Important Historical Books दोन महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पुस्तकांचा संच

1. शॅटर्ड लॅण्ड्स – सॅम डॅलरिम्पल
 पाने:640। किंमत: ₹700
अगदी १९२८पर्यंत, आशियातील एक विशाल प्रदेश ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, नेपाळ, भुतान, येमेन, ओमान, संयुक्त अरब अमिराती, कतार, बहारीन आणि कुवेत यांचा समावेश होता – एकाच साम्राज्यशाही सत्तेखाली होता. हा राजकीय भूभाग अधिकृतपणे ‘इंडियन एम्पायर’ (भारतीय साम्राज्य) म्हणून आणि सामान्यतः ‘ब्रिटिश राज’ किंवा केवळ ‘द राज’ या नावाने ओळखला जात असे.
सॅम डॅलरिम्पल यांचे हे विचक्षण पुस्तक ऐतिहासिक अभिलेखागारांमधील सखोल संशोधन, यापूर्वी कधीही अनुवादित न झालेली इंग्रजी, हिंदी, उर्दू, बंगाली, पंजाबी, कोन्याक, अरबी व ब्रह्मी या भाषांमधील खासगी संस्मरणे आणि मुलाखती यांवर आधारित आहे. या पुस्तकात महत्त्वाच्या राजकीय नेत्यांची व्यक्तिचित्रे आणि मोठ्या प्रमाणात घडून आलेली स्थलांतरे व युद्धे यांत ज्यांची वाताहत झाली, अशा सामान्य लोकांच्या कथांचा समावेश आहे. शॅटर्ड लॅण्ड्स हे एक जिवंत, रंजक आणि विचारप्रवर्तक पुस्तक असून, ते इतिहासाचे अत्यंत प्रभावी चित्रण करते.

2.गॉड्स, गन्स अॅण्ड मिशनरीज – मनू एस. पिल्लई
पाने:688। किंमत: ₹700
युरोपीय मिशनरी सोळाव्या शतकात भारतात पहिल्यांदा आले, तेव्हा त्यांनी ज्या जगात प्रवेश केला ते मोहमयी आणि गोंधळात टाकणारं होतं. हिंदू धर्म म्हणजे ‘भक्ती व उपासनांचा सावळागोंधळ’ अशी त्यांची धारणा झाली. कारण सैतानं आणि राक्षसं यांची पूजा करणारे, स्त्रियांना जिवंत जाळणारे, अतिशय विचित्र विधी करणारे आणि लहान मुलांना मगरींच्या तोंडी देणारे लोक अशा स्वरूपात त्यांनी हिंदू धर्माकडे पाहिलं होतं. परंतु थोड्याच काळात हे स्पष्ट झालं, की गौरवर्णी माणसांच्या साचेबद्ध कल्पनेहून हिंदूंची ‘विभूतीपूजा’ अधिक गुंतागुंतीची आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून मनू पिल्लई आपल्याला या लक्षवेधी घडामोडींच्या प्रवासास नेतात. राजे-महाराजे, कवी, बंदुकधारी क्रांतिकारक, राजकारणी, वादविवादपटू, तत्त्ववेत्ते आणि पाद्री-पुरोहित अशा अत्यंत लक्षवेधी व्यक्तिरेखांनी भरलेल्या या पुस्तकाचा आवाका महत्त्वाकांक्षी असून त्याची भूमिका अतिशय धारदार व अपारंपरिक आहे.