Selective Memory By Shobha De Translated By Aparna Velankar
Regular price
Rs. 396.00
Regular price
Rs. 440.00
Sale price
Rs. 396.00
Unit price
per
शोभा डे... या नावाकडं पाहण्याच्या अनेक नजरा आणि असंख्य दृष्टिकोन. सुपर मॉडेल... ‘सेलिब्रिटी’ पत्रकार... अनेक ‘बेस्ट सेलर’ पुस्तकं नावावर असलेली ख्यातनाम लेखिका... जिवलग स्नेही... कट्टर प्रतिस्पर्धी... सहकारी... आणि जिच्याजवळ विश्वासानं मन मोकळं करावं, अशी मैत्रीण ! ‘शोभा डे’ हे नाव आणि झगमगत्या ग्लॅमरचं वलय असलेला चेहरा लाखो लोकांना परिचित आहे, पण त्या वलयाआडच्या स्त्रीचं संवेदनशील, पारदर्शी व्यक्तित्त्व अत्यंत मोजके स्नेहीजन जाणतात. त्या व्यक्तित्त्वाचे रूपरंग मनमुक्तपणे उलगडून दाखवणारी ही स्मरणयात्रा.... सिलेक्टिव्ह मेमरी ! विविध दिशांनी धावणा-या कामाचा, करीअरचा जबरदस्त आवाका आणि अफाट वेग हा शोभा डे यांच्या जगण्याचा स्थायिभाव असला, तरी त्यांचं व्यक्तिगत जीवन मात्र कुटुंबाभोवती विणलेलं आहे. परस्परांमध्ये गुंतलेल्या नातेसंबंधांची वीण सतत ताजीतवानी,रसरशीत ठेवण्याचं आव्हान शोभा डे यांनी मोठ्या कौशल्यानं पेललं, कारण त्यांच्या जीवनप्रवासात ‘कुटुंब’ या संकल्पनेला सदैव अग्रक्रम राहिला. निडर बेधडकपणाची बीजं रुजवणारे बालपणातले अवखळ, बंडखोर दिवस... आई-बाबा आणि भावंडांबरोबरचे स्नेहबंध... जोडीदाराबरोबरच्या सहजीवनाचे तरल रंग आणि वाढत्या वयातल्या मुलांशी सतत स्वत:ला जोडून ठेवणारं समर्पित मातृत्व... स्वत:च्या व्यक्तिमत्त्वामधल्या अशा अनेक धाग्यांचं मनोज्ञ वर्णन शोभा डे यांनी या ‘स्मरणयात्रे’ मध्ये केलं आहे. आंतरराष्ट्रीय वर्तुळात स्थान मिळवणाNया शोभा डे यांच्या व्यावसायिक जीवनाचा आरंभबिंदू अगदी अवचित त्यांच्या हाती गवसला आणि यश-कीर्तीकडं घेऊन जाणारी नंतरची वाटचालही अत्यंत अनपेक्षितपणे ‘घडत’ राहिली. नकळत्या वयात मॉडेलिंगच्या मोहमयी दुनियेत योगायोगानंच झालेला प्रवेश... नंतर ‘संपादक’ म्हणून बहराला आलेली कारकीर्द... स्तंभलेखन... टी.व्ही.साठी पटकथालेखन आणि ‘लेखिका’ म्हणून मिळालेली आंतरराष्ट्रीय ख्याती. या प्रवासातल्या हरेक टप्प्यावर समाजात वेगानं घडणाNया बदलांचा अत्यंत सूक्ष्म वेध शोभा डे यांनी घेतला. आधुनिक भारतात उदयाला आलेल्या उद्धट,एककल्ली,नवश्रीमंतांची बेपर्वा जीवनशैली... आसुरी महत्वाकांक्षा आणि वैभवानं, उपभोगांनी गजबजलेलं पोकळ आयुष्य यांवरचं तिखट,परखड भाष्य, मर्मभेदी शैलीत शोभा डे यांनी वाचकांपुढं ठेवलं. अतिश्रीमंत वर्गातली स्वैर मौजमस्ती, रुपेरी पडद्यावर झगमगणा-या तारे-तारकांचं अंधळं अर्थहीन जगणं, सत्ता आणि संपत्तीच्या बळावर ‘सेलिब्रिटी’ म्हणून मिरवणाNया स्त्री-पुरुषांचे बुरख्याआडचे गलिच्छ व्यवहार... यांतलं काहीच शोभा डे यांच्या नजरेतून सुटलं नाही. झगमगत्या जगाचे अंधारे कोनेकोपरे पालथे घालताना हाती लागलेल्या अशा अनेक गोष्टी त्यांनी या स्मरणयात्रेमध्ये मोकळेपणानं नोंदवल्या आहेत. निर्भीड आणि रोखठोक शैली हे शोभा डे यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. त्याच वळणानं जाणा-या या स्मरणयात्रेत त्यांनी वेध घेतलाय् स्वत:चा... आयुष्याच्या हरेक टप्प्यावर अगदी सहज पायांखाली येत गेलेल्या अपरिचित वाटांचा, धडाडीनं शोधलेल्या नव्या दिशांचा आणि व्यक्तित्त्वाला आकार देणा-या व्यक्तींचा !मित्रांचा... आणि शत्रूंचा ! पारदर्शक सच्चेपणा हा या लेखनाचा प्राण आहे. त्यातूनच गवसते एका विलक्षण स्त्रीच्या बहुपेडी जगण्याची वीण... आणि ‘आख्यायिका’ बनून राहिलेल्या ‘शोभा डे’ या बहुचर्चित नावामागची जादूही !